रायगड जिल्ह्यात तीन अवैध पर्ससीन नौकांवर कारवाई

सिंधुदुर्गनंतर आता रायगड जिल्ह्यातही एलईडी आणि अवैध मासेमारी विरोधात मत्स्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे.  ५ जानेवारी २०२२ रोजी मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांनी १ अवैध एलईडी व २ अवैध पर्ससीन नौका पकडल्या.

Action against three illegal person Boat in Raigad district
Action against three illegal person Boat in Raigad district

नवीन सागरी मासेमारी कायद्याला नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य विधिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर राज्य सरकारचा मत्स्यव्यवसाय विभाग अवैध मासेमारी विरोधात कमालीचा सक्रीय झालेला दिसून येत आहे. सिंधुदुर्गनंतर आता रायगड जिल्ह्यातही एलईडी आणि अवैध मासेमारी विरोधात मत्स्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे.  ५ जानेवारी २०२२ रोजी मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांनी १ अवैध एलईडी व २ अवैध पर्ससीन नौका पकडल्या. या तीनही नौकांवर सुधारीत कायद्यानुसार कारवाई करुन प्रतिवेदन दाखल करण्यात येत आहे.

नवीन कायद्यानुसार एलईडी वापरल्यास पहिल्या उल्लंघनासाठी रु. ५ लाख दंड व नौका, जाळे व इतर साहित्य जप्त करण्याचे प्रावधान आहे. तर अवैध पर्ससीन मासेमारी केल्यास पहिल्या उल्लंघनासाठी १ लाख रुपये दंडाचे प्रावधान आहे. नवीन मासेमारी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे व केलेल्या कारवाईचा अहवाल दररोज सादर करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सातही सागरी जिल्ह्यांच्या सहायक मत्स्य आयुक्तांना दिलेले आहेत. मागील काही दिवसांमध्ये अवैध पर्ससीन व एलईडी विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्यानंतर अन्य सागरी जिल्ह्यांमध्येही मत्स्यव्यवसाय विभाग सक्रीय झाला आहे. पकडण्यात आलेल्या अन्य एका नौकेवर नाव आणि क्रमांक आढळले नाही.

कारवाई करण्यात आलेल्या नौकांचा तपशील 

  •  एलईडी धारण केलेली पर्ससीन नौका
    नौकेचं नाव दत्त साई IND-MH-3MM-232
  • अवैध पर्ससीन नौका

नौकेचं नाव वैभव लक्ष्मी प्रसन्न IND-MH-3MM-2250


हेही वाचा – Raigad : पोलीस दलातील श्वान ठरला ‘हिरो’ ; ‘ऑस्कर’ने 48 तासात केला हत्येचा उलगडा