Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे केडीएमसीत कर्मचाऱ्यांचा हम करेसो कायदा पडणार महागात

केडीएमसीत कर्मचाऱ्यांचा हम करेसो कायदा पडणार महागात

कल्याण डोंबिवली महापालिकेत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेची शिस्त कधी लागणार? असा सवाल उपस्थित होत आहे. 

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात पालिकेतील बायोमेट्रीक मशिन बंद असल्याने कामचुकार आणि लेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. सकाळी ९:४५ वाजता कार्यालयात हजर राहणे बंधनकारक असतानाही,  केडीएमसीत कर्मचाऱ्यांचा हम करेसो कायदा सुरू आहे. कर्मचारी मनमानीपणे सकाळी ११ वाजता कामावर येतात. त्यामुळे विविध कामानिमित्त पालिकेत आलेल्या नागरिकांना ताटकळत  राहावे लागते. त्यामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेची शिस्त कधी लागेल? असा सवाल उपस्थित होत आहे.

कर्मचाऱ्यांना वेळेची शिस्त कधी लागेल?  

सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६:१५ अशी कार्यालयीन कामाची वेळ आहे. मात्र, सकाळी ११ पर्यंत अधिकारी आणि कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने कार्यालयात शुकशुकाट असतो. कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर नसल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांना तब्बल अर्धा ते एक तास त्यांच्या कार्यालयाबाहेर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाट पाहत ताटकळत राहावं लागतं. तसेच प्रशासकीय कामावरही त्याचा परिणाम होत आहे. पालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. तसेच पाच दिवसांचा आठवडा केल्याने दोन दिवस सुट्टी असते. कर्मचाऱ्यांकडून चांगलं काम व्हावं, अशी यामागील अपेक्षा आहे. मात्र, कर्मचार्यांकडून या अपेAction will now be taken against the employees of Kalyan Dombivali Municipal Corporation who arrive late
क्षेला हरताळ फसला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे. पालिकेतील लोकप्रतिनिधीचा कालावधी संपल्याने सध्या पालिकेत प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे प्रशासनाचे प्रमुख असलेले आयुक्तांनाच आता  कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे दयावे लागणार आहे. याबाबत केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी ही गंभीर बाब असून सर्वच खात्याच्या विभागप्रमुखाना याबाबत नोटीस बजावण्यात येईल, असं सांगितले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – ठाण्यातील २८ हॉस्पीटल्स बंद


 

- Advertisement -