श्रीवर्धनमध्ये सागरी महामार्गानंतर पर्यटनाला अधिक चालना मिळेल – सुनील तटकरे

तटकरे यांच्या हस्ते वीर बाजीप्रभु देशपांडे चौक आणि कै. महेंद्र विद्याधर पोळेकर पाच रस्ता चौक यांचे नामकरण करण्यात आले.

After Marine Highway in Shrivardhan, tourism will get more boost - Sunil Tatkare
श्रीवर्धनमध्ये सागरी महामार्गानंतर पर्यटनाला अधिक चालना मिळेल - सुनील तटकरे

श्रीवर्धनमध्ये सागरी महामार्ग लवकर व्हावा यासाठी प्रयत्नशील असून, हा मार्ग झाल्यानंतर तालुक्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. श्रीवर्धन येथील भैरवनाथ पाखाडीमधील सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. काही वर्षांपूर्वी दोन रखवालदारांची निर्घृण हत्या करीत दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाचा मुखवटा चोरट्यांनी पळविला होता. त्या चोरांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून मुखवट्याचे वितळविलेले सोने हस्तगत करण्यात आले. हस्तगत केलेल्या सोन्यापासून सुवर्ण गणेशाचा पुन्हा मुखवटा तयार करून अजित पवार यांच्या हस्ते मुखवट्याचा लोकार्पण सोहळा करण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले. तटकरे यांच्या हस्ते वीर बाजीप्रभु देशपांडे चौक आणि कै. महेंद्र विद्याधर पोळेकर पाच रस्ता चौक यांचे नामकरण करण्यात आले.

श्रीवर्धनमधील पर्यटन हळूहळू बहरतंय…

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव थोड्या प्रमाणात कमी झाल्यानंतर  पर्यटकांचे शहरासह तालुक्यात येणे सुरू झाले आहे. नवरात्रीच्या मुहूर्तावर राज्य शासनाने देवस्थाने उघडण्याची परवानगी दिल्यानंतर जवळजवळ दीड वर्षांनी पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे.अलिकडच्या काही वर्षांत शहरात आणि तालुक्याच्या विविध भागात येणार्‍या पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली असताना दोन वर्षांपूर्वी याला कोरोनाची दृष्ट लागली आणि पर्यटनाची अवस्था एखाद्या कोमेजलेल्या फुलासारखी झाली. तेजीत आलेला रेस्टॉरंट, हॉटेल, लॉजिंग इथपासून भेळपुरी, वडापाव, चहा, नारळपाणी, स्थानिक खाद्यपदार्थ आदींचा व्यवसाय कोरोना आणि निर्बंध या कारणास्तव पर्यटकांची संख्या घटल्यामुळे ठप्प झाला. या सर्व व्यवसायांवर संकट आलेले असताना ३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळाने यापैकी अनेकांची धूळधाण उडवून टाकली. पुढे ‘तौक्ते’चा मोठा फटका बसला. स्वाभाविक हाच तो काय पर्यटन तालुका, असे विचारण्याची वेळी आली.कोरोना आणि वादळांच्या आपत्तीत अनेक व्यावसायिकांना प्रचंड आर्थिक झळ बसली असून, बँकांचे आणि इतर वित्तीय संस्थांचे कर्ज डोक्यावर असणारे पुरते कोलमडले. मात्र त्यानंतर मिळालेल्या थोड्याफार मदतीमुळे काहींनी आपला व्यवसाय पुन्हा कसाबसा सावरला आहे.


हे ही वाचा – ST worker strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परतीच्या प्रवासाचं ‘दिवाळं’