घरताज्या घडामोडीकोझिकोड विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचे दोन तुकडे झाले; अपघातात वैमानिकाचा मृत्यू

कोझिकोड विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचे दोन तुकडे झाले; अपघातात वैमानिकाचा मृत्यू

Subscribe

केरळच्या कोझिकोड येथील करिपूर विमानतळावर एअर इंडियाचे एक विमान उतरत असताना रनवे वरुन घसरले आहे. ज्यामुळे मोठा अपघात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विमान घसरल्यानंतर विमानाचे दोन तुकडे झाले. हे विमान दुबईहून आले होते. विमानातील १९० प्रवाशांपैकी किती लोक जखमी झाले आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. विमानाच्या पुढच्या भागाचा चुराडा झाल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार वैमानिकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. दीपक वसंत साठे असं मृत्यू झालेल्या वैमानिकाचं नाव आहे. विमान अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची फोनवरून केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे.

- Advertisement -

डीजीसीएच्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेस AXB1344 बोईंग 737 हे विमान दुबईहून येत होते. विमानात १९० प्रवाशी असल्याचे सांगितले जात आहे. मुसळधार पाऊस असल्यामुळे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर घसरले. या अपघातात विमानाचे अक्षरशः दोन तुकडे झाले.

- Advertisement -

 

कोझीकोडमध्ये विमान रनवेवरून घसरले, वैमानिकासह दोन प्रवाशांचा मृत्यू!

कोझीकोडमध्ये विमान रनवेवरून घसरले, वैमानिकासह दोन प्रवाशांचा मृत्यू!

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, August 7, 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -