घरCORONA UPDATECoronavirus: काजोल, न्यासा कोरोना पॉझिटिव्ह? अजय देवगन म्हणतो, 'काळजी करु नका'

Coronavirus: काजोल, न्यासा कोरोना पॉझिटिव्ह? अजय देवगन म्हणतो, ‘काळजी करु नका’

Subscribe

बॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता अजय देवगनने ट्विटरवर मोठा खुलासा केला आहे. एका संकेतस्थळावर २८ मार्च रोजी काजोल आणि मुलगी न्यासा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी प्रकाशित झाली होती. मात्र ही बातमी खोटी आणि निराधार असून काजोल आणि न्यासा एकदम ठिक असून काळजी करु नका, असे ट्विट अजय देवगनने केले आहे.

- Advertisement -

२० मार्च रोजी न्यासा सिंगापूरहून परत आली होती. कोरोना व्हायरसच्या संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर तेथील शाळा बंद करण्यात आल्यामुळे न्यासा भारतात परतली होती. त्यानंतर न्यासाची तब्येत खराब झाल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेह होते. यावेळी तिच्यासोबत कालोज देखील उपस्थित होती. यामुळेच काजोल आणि न्यासाला कोरोनाची लागण झाली असल्याची अफवा पसरली होती. मात्र आज अजय देवगन यांनेच या बातमीचे खंडन केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -