घरताज्या घडामोडीAlibaug : अलिबागमध्ये घरफोडी करणारी टोळी जेरबंद

Alibaug : अलिबागमध्ये घरफोडी करणारी टोळी जेरबंद

Subscribe

दुकाने फोडून हाताला लागेल तो माल चोरून नेण्याचा सपाटा लावला होता.

अलिबाग शहरासह तालुक्यातील मांडवा, पोयनाड आणि परिसरात घरफोड्या, चोर्‍या करून धुमाकूळ घालणार्‍या टोळीला येथील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सर्व आरोपी स्थानिक असून, त्यांच्याकडून घरफोडी, चोरीचे ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. एका रात्रीत दोन ते तीन दुकाने फोडून हाताला लागेल तो माल चोरून नेण्याचा सपाटा या चोरट्यांनी लावला होता. हर्षल घरत (२१, रा. शिरवली-अलिबाग), साहिल चव्हाण (२०, रा. शिरवली), भावेश म्हात्रे (२०, रा. नारंगी-अलिबाग), श्रेयस पाटील (२१, रा. रांजणखार-अलिबाग) अशी अटक केलेल्यांची नावे असून, या चौघांना ९ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे. यापैकी हर्षल घरत हा गेल्या २१ ऑगस्ट रोजी जेलमधून जामिनावर सुटला होता. त्यानंतर त्याने अन्य तिघांच्या साथीने टोळी बनवली आणि सातव्या दिवशी चोरी केली. रात्रीच्या वेळी हे चोरटे पल्सर मोटरसायकलचा वापर करून घरफोड्या, चोर्‍या करायचे.

गेल्या एक ते दीड महिन्यापासून या टोळीने धुमाकूळ घातला होता. २६ ते २८ ऑगस्ट या दरम्यान रेवस बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या कृष्ण संगम सोसायटीमधील गाळा क्रमांक २ येथील फायनान्स कंपनीचे कार्यालय, गाळा क्रमांक ३ मधील ओम साई मोटर्स आणि विद्यानगरमधील आदर्श बिअर शॉपीचे लोखंडी शटर उचकटून चोरी करण्यात आली होती. तर ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान शिवम घरत यांच्या वाडगाव फाटा येथील घरत कलेक्शन या दुकानाचे शटर उचकटून शर्ट, ट्रॅक पँट आदी साहित्य चोरून नेले होते. याच दरम्यान खडताळ पूल बामणोली येथील श्री हनुमान मंदिर आणि थळ टेकडीवरील श्री दत्त मंदिरातून दान पेट्या चोरीला गेल्या होत्या.

- Advertisement -

हे सत्र येथेच थांबले नाही तर ७ ते ८ आक्टोबर दरम्यान कुरूळ येथील करण हार्डवेअर दुकानातून फेन ड्रिल मशीन, रंगाचे डबे आणि रोख रक्कम या चोरांनी लंपास केली होती. घरफोडी, चोरी प्रकरणातील मोटरसायकल, कॉम्प्युटर, कपडे, हार्डवेअर दुकानातील माल, दानपेटी यासह चोरी करण्यासाठी वापरलेली वाहने पोलिसांनी जप्त केली असून, निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.


हे ही वाचा – कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून टीम लीडरसह चार जणांवर प्राणघातक हल्ला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -