Alibaug : जिल्हा रुग्णालयात स्त्री कक्षातील स्लॅब कोसळून दोन महिला जखमी

रुग्णालयातील कोणीही अधिकारी, कर्मचारी याबाबत बोलण्यास तयार नाही.

Alibaug: Two women injured in slab collapse in women's ward at district hospital
Alibaug : जिल्हा रुग्णालयात स्त्री कक्षातील स्लॅब कोसळून दोन महिला जखमी

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्त्री कक्षातील स्लॅबसह पीओपी  कोसळले आहे. या दुर्घटनेत दोन महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुसर्‍या मजल्यावर ही घटना घडली. स्लॅब पीओपी सिलिंगवरून खाली असलेल्या दोन महिलांच्या अंगावर पडल्याची चर्चा रुग्णांमध्ये आहे. मात्र रुग्णालयातील कोणीही अधिकारी, कर्मचारी याबाबत बोलण्यास तयार नाही. त्याचप्रमाणे काही महिला अधिकारी, कर्मचार्‍यांनी रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना ताकीद दिल्यामुळे कोणीही उघडपणे बोलण्यास तयार होत नाही.

दरम्यान, रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था केविलवाणीा असल्याने स्लॅब कोसळण्याच्या घटना अनेकदा घडत आहेत. मात्र याबाबत रुग्णालय प्रशासन फारसे गंभीर नसून, अशा घटनांत एखाद्या रुग्णाचा किंवा त्याच्या नातेवाईकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाचे डोळे उघणार का, असा संतप्त सवाल केला जात असून, रुग्यालयासाठी येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका कुठे खर्च केला जातो, याची माहितीही समोर यायला पाहिजे, असेही बोलले जात आहे. या दुर्घटनेबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्याशी संपर्क साधला असता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबतच्या दूरदृश्य प्रणाली बैठकीत असल्याचे त्यांनी सांगितले.

                                                                                 वार्ताहर – अमूलकुमार जैन


हे ही वाचा – अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ३६५ कोटी मंजूर, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय