घरताज्या घडामोडीसर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार ५ ऑक्टोबरपासून सुरू

सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार ५ ऑक्टोबरपासून सुरू

Subscribe

आता डबेवाल्यांनाही लोकलमधून परवानगी

राज्यात येत्या ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसेच मुंबईच्या डब्बेवाल्यांना लोकल प्रवासाचीही परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक-५ संदर्भात बुधवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये फेस मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक केला आहे. सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्याच्या सूचनादेखील राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

बुधवारी ठाकरे सरकारने अनलॉक-५ च्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करू देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरू लागली होती. अखेर हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू होतील.

- Advertisement -

पुणे विभागातील ट्रेन सुरू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. याशिवाय राज्यातल्या राज्यात धावणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील सुरू करण्यात येणार आहेत.

सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कामगारवर्ग लोकलने प्रवास करू शकतो आहे. मात्र, तरीही लोकलमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लोकलमधून प्रवास करू देण्याची विनंती डबेवाल्यांनी केली होती. ती सरकारने मान्य केली आहे. त्यासाठी डबेवाल्यांना क्यूआर कोड देण्यात येईल. मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये (एमएमएमआर) केवळ अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करण्यास परवानगी होती. मात्र अनलॉक-५ मध्ये हे निर्बंध मागे घेण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याने कारखाने आणि कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय आधी सरकारने घेतला होता. मुंबईतील सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्सदेखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात उद्या एक महत्त्वाची बैठक होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियम पाळून चित्रपटगृहे सुरू करण्याबद्दल या बैठकीत चर्चा होईल. त्यामुळे उद्या याबद्दल सकारात्मक निर्णय होऊ शकतो.

अनलॉक-५ च्या मार्गदर्शक सूचना जारी

सर्व वस्तूंच्या उत्पादनाचे उद्योग सुरू होणार

राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवेला परवानगी

ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर निर्बंध नाहीत

डबेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी

मुंबई महानगर प्रदेशमधील लोकल फेर्‍या वाढणार

पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू होणार

बारमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळावा लागणार

सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स, स्विमिंग पूल १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

अनलॉक-५ बाबत केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे जारी

केंद्र सरकारने अनलॉक-५ अंतर्गत येत्या १५ ऑक्टोबरपासून देशातील सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स, स्विमिंग पूल, शाळा, क्लास उघडण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने बुधवारी जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही परवानगी देण्यात आली असली सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स, स्विमिंग पूलमध्ये फक्त ५० टक्केच उपस्थिती असेल, असे निर्देश दिले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. केंद्राने जरी ही परवानगी दिली असली तरी त्याची अंमलबजावणी करायची की नाही, करायची तर कधी करायची, याचा निर्णय राज्य सरकारांवर सोपवला आहे.

शाळा, कोचिंग क्लास येत्या १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी घ्यायचा आहे. मात्र त्यासाठी शाळा, कोचिंग क्लासच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे. मात्र, कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत कडक लॉकडाऊन राहील, असे निर्देशही केंद्र सरकारने दिले आहेत.

शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिकवणी सुरू राहील. त्यासाठी प्रत्येक राज्यांनी प्रोत्साहन द्यायला हवे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली तर राज्याच्या शिक्षण मंडळाची मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे बंधनकारक राहणार आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत प्रवासावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच मालवाहतुकीलाही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. त्यासाठी कोणतीही विशेष परवानगी, परवाना अथवा ई-पास लागणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक काही परवानगींचा अपवाद वगळता बंदच राहणार आहे.

राज्य अथवा केंद्र शासित प्रदेश कंटेन्मेंट झोनच्या बाहेर कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय लागू करू शकणार नाही, असे निर्देशही केंद्र सरकारने दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -