घरताज्या घडामोडीमाथेरान गिरीक्षेत्रात ‘साहसी खेळांना’ परवानगी द्या - आमदारांची मागणी

माथेरान गिरीक्षेत्रात ‘साहसी खेळांना’ परवानगी द्या – आमदारांची मागणी

Subscribe

रायगड जिल्ह्यातील माथेरान हे गिरीस्थान म्हणून ओळखले जात असून, ते महाराष्ट्रासह देशातही नावाजलेले पर्यटन स्थळ असल्याजी जाणीव या आमदारांनी मंत्र्यांना करून दिली.

माथेरान गिरीस्थान येथे साहसी खेळाला परवानगी देण्याची मागणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रिय पर्यटन मंत्र्यांकडे केलीआहे. हे दोन्ही आमदार ही मागणी घेऊन दिल्लीत गेले आहेत.केंद्रिय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेत या आमदारांनी त्यांना निवेदन दिले. रायगड जिल्ह्यातील माथेरान हे गिरीस्थान म्हणून ओळखले जात असून, ते महाराष्ट्रासह देशातही नावाजलेले पर्यटन स्थळ असल्याजी जाणीव या आमदारांनी मंत्र्यांना करून दिली. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० मीटर इतक्या उंचीच्या या पर्यटन स्थळाला इको सेंसिटीव्ह झोनचा दर्जा असून हेरीटेज म्हणूनही त्याची नोंद झाली आहे. या परिसरात कोणताही उद्योग आणि कोणतेही मोटार वाहन चालवले जात नाही. यामुळे ‘टॉय ट्रेन’ चालवली जात आहे. हे ठिकाण म्हणजे पर्यावरणपूरक पर्यटनाचे हे एकमेव जागतिक ठिकाण असल्याचे सांगण्यात आले.

इको सेन्सिटिव्ह झोन असल्याने पर्यटन हा येथील मुख्य व्यवसाय आहे. दरवर्षी जगभरातील सुमारे दहा लाख पर्यटक माथेरान गिरीस्थानच्या पर्यटनाचा आनंद घेतात. अधिकाधिक पर्यटकांना या क्षेत्राकडे आकर्षित करून, पर्यटन वाढीसाठी ’साहसी खेळ’ असणे आवश्यक असल्याची बाब मंत्र्यांपुढे ठेवण्यात आली. साहसी खेळांना आज जगभरात मान्यता मिळाली आहे आणि पर्यटकांमध्ये साहसी खेळांचे विशेष आकर्षण आहे. यामुळे माथेरान गिरीक्षेत्र येथे पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच स्थानिक लोकांचा रोजगारही वाढेल, त्यामुळे माथेरान गिरीस्थानमध्ये पर्यटन, विकास आणि स्थानिक रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी ‘साहसी खेळास’ परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

- Advertisement -

हे ही वाचा – Konkan Rain Update : कोकणात मुसळधार पावसाचे थैमान; गुहाघरमध्ये पुरस्थिती, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -