शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

exam

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार केंद्र शासनाने अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या इयत्ता १ ली ते १० वी या वर्गांतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी राज्यातील मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी आणि जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन २००८-०९ पासून सुरू केली आहे. इयत्ता १ ली ते १० वी मधील विद्यार्थ्यांचे नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल २.० (www.scholarships.gov.in) या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२१ असून, शाळा स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२१ अशी आहे. हे अर्ज भरण्याची सोय www.minorityaffairs.gov.in  या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी केले आहे.


हे ही वाचा – एसटीची ऐतिहासिक पगारवाढ कर्मचार्‍यांचा संप मात्र कायम आज निर्णयाची शक्यता!