Cruise Drug Case : आर्यनचा कोठतील मुक्काम वाढला, बुधवारी सुनावणी

Bombay High Court To Hear Aryan Khan Bail Plea In Cruise Ship Drug Case On Tuesday
Aryan Khan Drugs Case: आर्यन खानचा कारागृहातील मुक्काम वाढला; मंगळवारी जामीन अर्जावर होणार सुनावणी

क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी बॉलिवुड अभिनेता शाहरूख खानच्या जामीन अर्जावर आज सोमवारी सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. अटकेत असलेल्या आर्यन खान आणि इतर ७ आरोपींच्या जामिन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. आर्यन खान सह अरबाज मर्चंट याने देखील जामिनासाठी अर्ज दाखल केला. पण आर्यन खानच्या जामीन अर्जावर आता बुधवारी १३ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आज आर्यन खानला जामीन मिळेल अशी अपेक्षा असतानाच त्याच्या अर्जावर सुनावणी पुढे ढकलल्याने आर्यनचा न्यायलयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

यापूर्वी, अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांनी खान यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. हा अर्ज कायम ठेवण्यायोग्य नव्हता, कारण आर्यन खानच्या जामिनावर बुधवारी १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. एनसीबीने न्यायालयात अद्यापही आपले म्हणणे मांडलेले नाही. तसेच एनसीबीने एक आठवड्याचा वेळ मागून घेतला आहे. अर्जावर बुधवारी सुनावणी होणार असल्यानेच आर्यन खान आणि इतर आरोपींचा बुधवार पर्यत तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. आजच्या सुनावणीत एनसीबीने आपले कोणतेही म्हणणे न मांडल्यानेच त्यांच्या अर्जावरील सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे.