Homeताज्या घडामोडीAshok Dhodi : बेपत्ता अशोक धोडींची हत्या, मृतदेह गाडीसह खाणीत फेकला

Ashok Dhodi : बेपत्ता अशोक धोडींची हत्या, मृतदेह गाडीसह खाणीत फेकला

Subscribe

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा दगड खाणीत पडलेल्या त्यांच्या गाडीत मृतदेह आढळून आला आहे. अशोक धोडी यांची कार गुजरातमध्ये सापडली आहे. भिलाडजवळील सरिग्राम मालाफलिया इथे एका बंद दगड खाणीत त्यांची गाडी सापडली.

पालघर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा दगड खाणीत पडलेल्या त्यांच्या गाडीत मृतदेह आढळून आला आहे. अशोक धोडी यांची कार गुजरातमध्ये सापडली आहे. भिलाडजवळील सरिग्राम मालाफलिया इथे एका बंद दगड खाणीत त्यांची गाडी सापडली. घटनास्थळी तातडीने पालघर पोलिसांचं पथक दाखल झाले असून गाडीत सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Shiv Sena office bearer Ashok Dhodi body found in the trunk of a car that fell into a stone quarry)

पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात मोठी घडामोड समोर येत आहे. 20 जानेवारीला संध्याकाळी त्यांची लाल रंगाची कार गुजरातच्या दिशेने गेली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले. त्यामुळे अशोक धोडी बेपत्ता झाले नसून त्यांचे अपहरण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. तसेच संशयित आरोपींची नावेही कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे. यानंतर आता अपहरणाच्या 12 दिवसांनंतर अशोक धोडी यांची कार गुजरातमध्ये सापडली आहे. भिलाडजवळील सरिग्राम मालाफलिया इथे एका बंद दगड खाणीत त्यांची गाडी सापडली. घटनास्थळी तातडीने पालघर पोलिसांचे पथक दाखल झाले. यावेळी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलही स्वतः घटनास्थळी पोहोचले.

प्राथमिक तपासानुसार, अवैध दारू तस्करीसंदर्भात झालेल्या वादातून अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. धोडी हे या तस्करीत अडथळा ठरत असल्याने आरोपींनी त्यांचा काटा काढण्यासाठी हा कट रचल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून पाच जण अद्यापही फरार आहेत. विशेष म्हणजे मुख्य आरोपी अविनाश धोडी, जो मृत अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ आहे, तो अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. अटकेत असलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अखेर हा गुन्हा उघडकीस आणला.

अविनाश धोडी वेवजी पोलीस चौकीतून फरार

दरम्यान, शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात संशयित आरोपी अविनाश धोडीला घोलवड पोलीस ठाण्याच्या वेवजी पोलीस चौकीत चौकशीसाठी बोलण्यात आले होते. अविनाश धोडी यानेच अशोक धोडी यांचे अपहरण केल्याचा कुटुंबीयांनी केला होता. त्यामुळे अविनाश धोडीला चौकशीसाठी बोलण्यात आले होते. वेवजी पोलीस चौकीत चौकशीसाठी आल्यानंतर अंधाराचा फायदा घेत अविनाश धोडी हा फरार झाला आहे. त्यामुळे घोलवड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाश धोडीचा शोध सुरू आहे.


हेही वाचा – हिंगोलीतील धक्कादायक घटना; तीन विद्यार्थिनींच्या धावत्या ऑटोतून उड्या, एकीचा मृत्यू