घरताज्या घडामोडीइतिहासातील शौर्याची साक्ष देणाऱ्या कुलाबा किल्ल्याचा इतिहास पर्यटकांसमोर उलघडणार - रघुजीराजे आंग्रे

इतिहासातील शौर्याची साक्ष देणाऱ्या कुलाबा किल्ल्याचा इतिहास पर्यटकांसमोर उलघडणार – रघुजीराजे आंग्रे

Subscribe

पर्यटक कुलाबा किल्याला आवर्जून भेट देतात.

अलिबागचा विस्तीर्ण समुद्र किनारा, नारळी फोफळीच्या बागा, नैसर्गिक सौदर्यं याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. याशिवाय समुद्रात असणारा कुलाबा किल्याला पर्यटक आवर्जून भेट देतात. अलिबागमधील कुलाबा किल्ला पाहण्यासाठी मराठा आरमाराचे मुख्यालय आणि अलिबाग समुद्राचा अष्टगराचा राजा म्हणून कुलाबा किल्ल्याला ओळखले जाते. मात्र इथे येणारे पर्यटक फक्त किल्ला फिरुन येथील देवीचे दर्शन करुन निघून जातात. त्यामुळे इतिहास जाणून घेण्याची बहुतांश पर्यटकांची मानसिकता नसतेच, शिवाय या किल्ल्यावर कोणीही मार्गदर्शक उपलब्ध नसल्यामुळे किल्ल्याचा इतिहास पर्यटकांपर्यंत पोहचत नाही. मात्र हेच चित्र आता काही दिवसानंतर पालटणार आहे. या कुलाबा किल्ल्याची आणि या मराठा आरमाराच्या मुख्यालयाच्या कामगिरीच्या कार्यपद्धतीचा इतिहास आता पर्यटकांसमोर उलघडणार आहे. हा इतिहास उलघडून सांगण्यासाठी या कुलाबा किल्ल्यावर २२ मार्गदर्शक असणार आहेत. साडे पाचशे वर्षांचा इतिहास आता शब्दरुपाने पर्यटकांसमोर उभा राहणार आहे.हे चित्र पालटण्यासाठी पुरातत्व विभाग,टूरिझम विभाग आणि बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने २२ तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या तरुणांना कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनीही संपूर्ण किल्ला फिरुन माहिती दिली आहे. याशिवाय या मार्गदर्शक तरुणांमध्ये दोन महिला मार्गदर्शकांचाही समावेश आहे.

कुलाबा किल्यात सर्जेकोट, कान्होजी आंग्रे घुमटी, अंधारवाव,दारुगोळा ठेवण्याचे ठिकाण,गोड्या पाण्याच्या विहीरी,दारुगोळा ठेवण्याचे ठिकाण, ऐतिहासिक तोफा,उजव्या सोंडेचा पंचायतन गणेश मंदिर,हनुमान मंदिर,शिव मंदिर,दर्गा, यासह अनेक वास्तू इतिहासाची साक्ष देत आहेत.मात्र ही ठिकाणे कुठे आहेत,कुठे काय कामगिरी केली जायची, याबाबतची इंतभूत माहिती आता पर्यटकांना मिळणार आहे. मुळात आपला ऐतिहासिक वारसा जपणे फार महत्त्वाचे असून,त्याबाबतची माहिती आपल्या भावी पिढीला समजणेही तितकेच आवश्यक आहे. याशिवाय तालुक्यातील स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – सहकारी साखर कारखान्याला नवसंजीवनी देणार, सहकार क्षेत्राच्या बैठकीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया


 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -