घरताज्या घडामोडीरोड छाप भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही

रोड छाप भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही

Subscribe

भाजप मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांची टीका

बायका, मुलं आम्हाला पण आहेत, म्हणून आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरतो, या भ्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राहू नये, राज्याच्या सुव्यवस्थेकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, कोरोनाच्या संकटावर मात करावी. दात पाडू, बघून घेऊ ही रोड छाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का? भाजपाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये, असा इशारा भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार या महिन्यात एक वर्ष पूर्ण करत आहे. त्या निमित्ताने सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी उद्वव ठाकरे यांची खास मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीवरुन राज्यात वातावरण तापले आहे. भाजपनेही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेतानाच राऊत यांनी विचारलेल्या राजकीय प्रश्नांनाही मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत. ‘सूडानेच वागायचे असेल तर तुम्ही एक सूड काढा आणि आम्ही १० सूड काढू,’ असा सूचक इशाराही विरोधकांना दिला आहे. यावरून भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

‘महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी दमबाजीची भाषा करतात. राज्याचे मुख्यमंत्रीच दात पाडणे, धमक्या देण्याची भाषा करतात हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेच्या विरोधातले आहे आणि ते मुख्यमंत्री आहेत की एखाद्या गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख?,’ असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.

- Advertisement -

‘तुमच्या अंगावर येऊ, तुम्हालाही मुलं-बाळं आहेत, असे मुख्यमंत्री म्हणतात. मी त्यांना आठवण करुन देऊ इच्छितो की मुलं-बाळं आम्हालाही आहेत. पण आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरतो, अशा भ्रमात त्यांनी राहू नये. राज्याच्या सुव्यवस्थेकडे त्यांनी लक्ष द्यावे, भाजपला धमक्या देण्याचा प्रयत्न त्यांनी करु नये, असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -