Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे काम सुरु केल्यास एकही वीट रचू देणार नाही, बुलेट ट्रेनवरुन मनसे आक्रमक

काम सुरु केल्यास एकही वीट रचू देणार नाही, बुलेट ट्रेनवरुन मनसे आक्रमक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.

Related Story

- Advertisement -

बुलेट ट्रेन जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेने महासभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव गेल्या दीड वर्षांपासून रखडला होता. महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्या शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केलाय परंतु आता या प्रकल्पाच्या जागा हस्तांतरणावरुन वाद निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची परवानगी न घेता काम सुरु केलं तर एकही वीट उचलू देणार नाही असा थेट इशारा मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. बुलेट ट्रेन जागा हस्तांतरणावरुन मनसेनं आक्रमक भुमिका घेतली असल्यामुळे या प्रकरणावर राजकीय वादंग रंगलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सभेमध्ये अचानक हा विषय चर्चेला आला आणि चर्चेविनाच तो संमत करण्यात आल्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.

मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बुलेट ट्रनेच्या जागा हस्तांतरणावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला मनसेकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. अविनाश जाधव यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, आम्ही काम करुन देणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. त्यावेळी देखील मनसेने बुलेट ट्रेनची कामं बंद पाडली होती. शिवसेनेने बंद पाडली नव्हती. कुठलेही काम शिवसेनेनं रस्त्यावर उतरुन केलं नव्हते. जर राज ठाकरे यांची परवानगी न घेता हे काम सुरु केलं तर एकही वीट रचू देणार नाही असा इशाराच अविनाश जाधव यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

शिळ भागातील ३ हजार ८४९ चौ.मी जागा बाधित

- Advertisement -

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग ठाणे पालिका क्षेत्रातील शिळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून जाणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेच्या मालकीची शिळ भागातील ३ हजार ८४९ चौरस मीटर इतकी जागा बाधित होणार आहे. ही जागा प्रकल्पासाठी देण्याची मागणी एनएचएसआरसीएलने पालिकेकडे दोन वर्षांपूर्वी केली होती. या प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) काही वर्षांपासून राबवायला सुरुवात केली आहे.


हेही वाचा : बुलेट ट्रेनबाबतचा प्रस्ताव ठाणे मनपात चर्चेविनाच मंजूर


- Advertisement -

 

- Advertisement -