घरताज्या घडामोडीनगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे श्रीवर्धन किनार्‍यावर येणार्‍या पर्यटकांचे हाल

नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे श्रीवर्धन किनार्‍यावर येणार्‍या पर्यटकांचे हाल

Subscribe

नगरपरिषदेला आपल्याच घोषणेचा विसर झालेला पहायला मिळतोय.

श्रीवर्धन नगरपरिषदेकडून वेताळ पाखाडी येथील पाराजवळ पर्यटकांसाठी शौचालय व स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु,गेले काही महिने शौचालय व स्नानगृह पूर्णपणे बंद अवस्थेत असल्यामुळे येणार्‍या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली आहे. खासदार सुनील तटकरे ह्यांच्या हस्ते ११ जानेवारी २०११ रोजी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत वेताळ पाखाडी येथील पाराजवळ पर्यटकांसाठी शौचालय व स्नानगृहाचे भूमिपूजन झाले होते. काही वर्षे व्यवस्थितरित्या सुरू असलेले शौचालय व स्नानगृह सद्यस्थितीत बंद अवस्थेत असून लोखंडी गेट जीर्ण अवस्थेत आहे. शौचालय आणि स्नानगृहात लाद्यांचे तुकडे व घाणीचे साम्राज्य बघावयास मिळते. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची शौचालय व मुतारी अभावी गैरसोय होऊ लागली आहे. स्नानगृहाच्या इमारतीवर”उघड्यावर जाऊ नका शौचाला,संधी मिळेल रोगराईला”,तसेच ‘स्वच्छ,सुंदर व हरित श्रीवर्धन’ हा फलक लावण्यात आला आहे.पण स्नानगृहातील घाण व कचरा पाहता नगरपरिषदेला आपल्याच घोषणेचा विसर झालेला पहायला मिळतो.

लवकरच सुरळीत होईल…

“निसर्ग चक्रिवादळाचा फटका वेताळ पाखाडी येथील स्नानगृह व शौचालयाच्या इमारतीस हीबसला. चक्रिवादळानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव व निर्बंध ह्यामुळे इमारतींचे काम होऊ शकले नाही. आता कोरोनाच प्रमाण कमी होऊ लागल आहे. लवकर इमारतीची दुरुस्ती होईल.पर्यटकांची गैरसोय होणार नाही. ही मी ग्वाही देतो.”

- Advertisement -

फैैसल हुर्जुक – नगराध्यक्ष, श्रीवर्धन नगरपालिका


हे ही वाचा – Pakistan Unemployment : पाकिस्तानात बेरोजगारीचा उच्चांक, शिपायाच्या १ पदासाठी १५ लाख अर्ज 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -