साहेब तुम आगे बढो, हम आपके साथ है; डोंबिवलीत शिंदे समर्थकांची बॅनरबाजी

eknath shinde banner in dombivali

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर एकीकडे शिवसैनिकांनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतलेली असतानाच आता शिंदे समर्थक शिवसैनिकांनी समर्थनाचे बॅनर लावले आहेत. (Bannerwar in Dombivali by Eknath Shinde supporter)

हेही वाचा – जन्मदात्री शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करू नका, उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्दे

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाविरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेच्या गोटात शांतता पसरली होती. मात्र आता डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी मनसेमधून शिवसेनेत आलेल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सागर जेधे, दीपक भोसले, राजेश मुणगेकर या चार शिवसैनिकांनी डोंबिवलीत बॅनरद्वारे एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिलेले बॅनर लावले आहेत.


या बॅनरवर “लोकांचा लोकनाथ एकनाथ शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून शुभेच्छा! साहेब आगे बढो, हम आपके साथ है! असे लिहून होर्डिंग्ज लावत एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं आहे.