Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी प्रेमाला दिला नकार; तरुणीने केले तरुणाच्या चेहऱ्यावर वार

प्रेमाला दिला नकार; तरुणीने केले तरुणाच्या चेहऱ्यावर वार

Related Story

- Advertisement -

एकतर्फी प्रेमातून एका तरुणीने तरुणाच्या तोंडावर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेश येथील बरेलीत घडली आहे. सातत्याने प्रपोज केल्यानंतरही तरुणाने प्रतिसाद न दिल्याने त्या रागातून तरुणीने वार केल्याचं सांगितलं जातंय. या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या मुलावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पण, अजूनही या प्रकरणाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही.

तरुण आणि तरुणी एकमेकांना ओळखत असून एकाच कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत. तरुणीचं तरुणावर प्रेम आहे. त्यातूनच तिने त्याला अनेकदा प्रपोज देखील केले. पण, त्याच्या मनात प्रेम भावना नसल्याकारणाने त्याने तिला नकार दिला. त्याच रागातून तरुणीने त्याच्या चेहऱ्यावर ब्लेडने सपासप वार केले.

- Advertisement -

तरुण अभ्यासावर लक्ष देत होता. मात्र तरुणी त्याला लग्नासाठी टॉर्चर करत होती. तिने रागाच्या भरात रस्त्यातच तरुणावर ब्लेडने हल्ला केल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात. दरम्यान, रक्तबंबाळ झालेल्या तरुणाचा चेहरा बघून तरुणीला चक्कर आली आणि तीही रस्त्यात पडली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार हे दोघं ज्या महाविद्यालयात शिकतात त्याच रस्त्यावर घडला असल्याची माहिती प्राचार्यांनी दिली आहे. ” तुला तुझ्या चेहऱ्यावर गर्व आहे ना? मग मीच तो चेहरा विद्रूप करते”, असं म्हणत या मुलीने वार केल्याचंही प्रत्यक्षदर्शी सांगतात.

दरम्यान, या प्रकरणात दोघेही अल्पवयीन असून कोणीही तक्रार दाखल केली नसल्याची माहिती बरेली पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -