घरताज्या घडामोडीबेजबाबदारपणा : माथेरान नगरपरिषदेच्या डॉक्टरांमुळे तरुणाचा बळी

बेजबाबदारपणा : माथेरान नगरपरिषदेच्या डॉक्टरांमुळे तरुणाचा बळी

Subscribe

माथेरान नगरपरिषदेमधील एकमेव हॉस्पीटलच्या डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

माथेरान नगरपरिषदेच्या बि.जे. हॉस्पीटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना अत्यावश्यक सेवा मिळणे म्हणजे राम भरोसे झाले आहे. सध्या या माथेरान नगरपरिषदेच्या दवाखान्यात दोन MBBS डॉक्टर कार्यरत आहेत. तर नगरपरिषदेकडून मानधनावर एका डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या माथेरान नगरपरिषदेमधील एकमेव हॉस्पीटलच्या डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे  फोटोग्राफीचे काम करणाऱ्या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा तरुण म्हणजेच नकीम हकीम शेख हा ३९ वर्षाचा असून,संत रोहिदास नगर माथेरान येथील रहिवासी आहे.
नकीम शेख हा तरुण आपल्या फोटोग्राफीचा व्यवसाय करुन घरी परतला. थोड्यावेळाने नकीमल अस्वस्थ वाटल्याने तो खाली बसला. भोवळ आल्याने नकीम बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी त्याच्या नातेवाईकांनी माथेरान बि.जे. हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र, याठिकाणी एकही डॉक्टर हजर नसल्याने हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना अन्य ठिकाणी हलविण्यास सांगितले. नकीमला रायगड हॉस्पिटल येथे हलविण्यात आले यावेळी आपली चुक लक्षात आल्याने सहानुभूती दाखवत रुग्णाच्या अगोदर माथेरान बि.जे. हॉस्पीटलमधील कर्तव्यावर रूजू असलेले डॉ.अजित रॉय यांनी देखील रायगड हॉस्पिटल गाठले. मात्र, नकीमने रुग्णवाहिकेतून आणतानाच आपले प्राण सोडले होते,असे रायगड हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर नकीमच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह माथेरान बि.जे.हॉस्पिटल येथे नेला. तेव्हा उपस्थित नागरिक आणि तेथील लोकप्रतिनिधींनी आपण दवाखान्यात हजर का नव्हता? अशी विचारणा डॉक्टरांना केली. मात्र डॉ.अजित रॉय यांनी कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिले नाही. या घटनेतील मयत नकीमची माथेरान पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे माथेरानकर हळहळ व्यक्त करत आहेत. दुसरीकडे डॉ.रॉय यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी देखील मागणी जोर धरू लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -