घरताज्या घडामोडीलोकांसाठी श्रीखंड्या व्हायला मला आवडेल

लोकांसाठी श्रीखंड्या व्हायला मला आवडेल

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उद्गार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारीऔरंगाबाद शहरासाठी नव्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले आहे. या कार्यक्रमात शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा श्रीखंड्या म्हणून उल्लेख केला. यावेळी माझ्या कावडीने लोकांच्या घरी पाणी येत असेल तर मला श्रीखंड्या व्हायला आवडेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

संत एकनाथ महाराजांनी पाणी आणायचं काम केलं, तर त्यांच्या शिष्याने कावडीने रांजण भरले. आज मुख्यमंत्री यांनी कावड आणली म्हणून हौद भरत आहे, अशी भावना शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, की आम्हाला गाडगेबाबा सारखे काम करायचे आहे. पाण्यासाठी व अन्नासाठी. आजपर्यंत औरंगाबाद पाणी पुरवठा योजनेची लेझीम सुरू होती. मात्र, माझ्या कावडीने लोकांच्या घरी पाणी येत असेल तर मला श्रीखंड्या व्हायला आवडेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांत जे खड्डे पडले ते बुजवायचे आहेत, रस्ते चांगले होतील. मी भूमीपूजन करुन थांबणार नाही तर न सांगता कामाची पाहणी करण्यासाठी येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग 1 मे ला सुरू करणार असेही त्यांनी आश्वासन दिले आहे. गुंठेवारीचा प्रश्न सोडणार असून आता मला घाई आहे. हे शहर शिवसेना प्रमुखांचे आवडते शहर आहे. काही म्हणतात की निवडणूक आली म्हणून तुम्ही आले. निवडणूक आली तर काम करायचे नाही का? इतके वर्षे रखडलेली योजना माझ्या हस्ते होतोय हे माझे भाग्य आहे. जेव्हा मी बोलतो ते मनातून बोलतो विद्वान म्हणून नाही तर मनातून बोलतो, असेही शेवटी मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -