पालघरमध्ये मोठा स्फोट ! फटाके कारखान्याच्या भीषण आगीत ३० जण जखमी

स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांना मोठे धक्के

Big explosion in Palghar! 30 injured in firecracker factory fire
पालघरमध्ये मोठा स्फोट ! फटाके कारखान्याच्या भीषण आगीत ३० जण जखमी

पालघरमध्ये डहाणू येथील डेहणे येथील फाटाका कंपनीच्या बाजूला मोठा स्फोट झालाय. स्फोटाच्या आवाजाने पालघर परिसर हादरले आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांना मोठे धक्के बसल आहेत. फटाक्याच्या कंपनीच्या बाजूला झालेल्या या स्फोटांमुळे १५ किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला आहे. (Big explosion in Palghar dehne sound shook the area up to 15 km) स्फोटामुळे डेहणे परिसरात धुरांचे लोट हवेत पसरले आहेत. फटाके कंपनीत वेल्डिंग करताना ठिणगी पडल्याने फटाके कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील १० कामगार गंभीरित्या जखमी झालेत तर २० कामगार किरकोळरित्या जखमी झाले आहेत. (Big explosion in Palghar! 30 injured in firecracker factory fire) स्फोटात जखमी झालेल्या सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. फटाक्याच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटात कोणतीही  जिवीत हानी झालेली नाही.

या स्फोटात आगवण, डेहणे, आशागड,डहाणू शहर, वाणगाव यासारख्या अनेक भागात स्फोटाचे तीव्र धक्के बसले. सुरुवातीला हे भूकंपाचे धक्के असावेत असा अंदाज गावकऱ्यांनी लावला होता. मात्र आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळांचे साम्राज्यपासून गावात भितीचे वातावरण निर्माण झाले. रिलायन्स प्रकल्प आणि भोईसरहून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आले मात्र तोपर्यंत कारखाना जळून खाक झाला होता. डहाणू पोलिसांनी देखील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्फोटाची भीषणता इतकी गंभीर होती की डेहणे गावापासून जवळपास १२ ते १५ मीटरपर्यंतच्या परिसराला याचे मोठे धक्के बसले आहे. संपूर्ण डहाणू या स्फोटाच्या आवाजाने हादरल्याचे सांगण्यात येत आहे.

 


हेही वाचा – शिक्षकांना लोकल प्रवास नाहीच