घरताज्या घडामोडीShrivardhan : श्रीवर्धनमध्ये धगधगतोय कचरा प्रश्न

Shrivardhan : श्रीवर्धनमध्ये धगधगतोय कचरा प्रश्न

Subscribe

श्रीवर्धन येथून ३ किलोमीटर अंतरावर गायगोठण परिसरात नगर परिषदेचे कचरा साठवणूक केंद्र असून, जमा झालेल्या घनकचर्‍यातून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. मात्र काही महिन्यांपूर्वी प्रकल्प बंद पडल्यामुळे कचर्‍याचे ढीग साचून या परिसराला अवकळा आली आहे.घन कचर्‍यापासून खत निर्मिती प्रकल्प बंद झाल्यापासून गायगोठण परिसरात घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे यामुळे डास, माश्यांचा उपद्रव वाढला असून, घाणीमधे खाद्याच्या शोधात इतर पक्षीही येतात. या परिसरात स्थानिकांच्या विहिरी असून, त्यातील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो. परंतु पक्षी खाद्याच्या शोधात आल्यानंतर विहिरीच्या कठड्यावर बसतात आणि तेथेच विष्ठा टाकत असल्यामुळे त्या पाण्याचा वापर करणे धोकादायक ठरत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कचरा साठवणूक केंद्रातील कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही.

विशेष म्हणजे कचरा गाडी पूर्ण क्षमतेने भरलेली असतानाही त्यावर कचर्‍याच्या पिशव्या ठेवल्या जातात. ही गाडी खड्ड्यातून गेली की या पिशव्या खाली पडतात. शहरात प्लास्टिक पिशवीवर बंदी असूनही त्या येतात कुठून, असा सवाल उपस्थित होत आहे. वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे गायगोठण येथील नागरिकांनी नगराध्यक्ष फैसल हुर्जुक आणि मुख्याधिकारी विराज लबडे यांची भेट घेऊन कचर्‍या संदर्भात लवकर तोडगा काढावा याकरिता निवेदन दिले. यावेळी नगर परिषदेचे गटनेते अनंत गुरव, माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक किरण केळसकर उपस्थित होते.

- Advertisement -

नगर परिषदेने 10 दिवसांत कचरा डेपोच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला नाही तर डेपोच्या गेटला कुलूप लावले जाईल.
-अनंत गुरव, गटनेता

आपण स्वतः कचरा डेपो परिसराची पाहणी करणार असून, काही दिवसांत बंद अवस्थेत असलेला खत निर्मिती प्रकल्प आणि डेपोच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल.
-फैसल हुर्जुक, नगराध्यक्ष

- Advertisement -

   वार्ताहर :- समीर रिसबुड


हे ही वाचा – JNPT School : जेएनपीटी शाळेत शिक्षणाचा बाजार ; २ हजार ७०० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -