घरताज्या घडामोडीसरकारच्या मानगुटीवर बसून मराठा आरक्षण मिळवा, मवाळ भूमिका घेऊ नका, चंद्रकांत पाटलांचा...

सरकारच्या मानगुटीवर बसून मराठा आरक्षण मिळवा, मवाळ भूमिका घेऊ नका, चंद्रकांत पाटलांचा संभाजीराजेंना सल्ला

Subscribe

मराठा आरक्षणासाठी कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत थांबायचे हे आम्हाला मान्य नाही

मराठा आरक्षण मिळेपर्यंत सवलती सुरु करण्यासाठी जो जो संघर्ष करेल त्याच्यासोबत आम्ही आहोत. संभाजी राजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. मात्र कोरोनामुळे शांत राहून सरकारला मदत करण्याची त्यांची कृती आम्हाला मान्य नाही. संभाजीराजेंची कृती ही सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण मिळवण्याची असल्यास आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून त्यांच्या सोबत आहोत. सरकारच्या मानगुटीवर बसून मराठा आरक्षण मिळवा, मवाळ भूमिका घेऊ नका असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी संभाजीराजेंना दिला. (BJP Leader Chandrakant Patil advises Sambhaji Raje on Maratha reservation)   मराठा आरक्षणासाठी संभाजी राजेंनी संघर्ष न करता आरक्षण मिळावे असे म्हटले त्याचप्रमाणे कोरोनाचा कालावधी संपल्यावर बघूया असेही ते म्हणाले, आम्हाला हे मान्य नाही. मराठा आरक्षणाचा आणि कोरोनाचा काही संबंध नाही. सर्व जनजीवन ठिक सुरु आहे. राज्यात भष्ट्राचार सुरु आहे. मग मराठा आरक्षणासाठी कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत थांबायचे हे आम्हाला मान्य नाही असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

रिव्हू पेटिशन दाखल करा, ज्या दोन वर्षांत कायदा होता त्या तरुण तरुणींना नोकऱ्यांची लेटर्स द्या, आरक्षण मिळेपर्यत सवलती द्या,मागास आयोग नेमा,अशा मागण्या आम्ही केल्या होत्या त्याच मागण्या संभाजीराजेंनी पुन्हा केल्या, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

- Advertisement -

अजित परावांना टोला

अजित पवारांच्या सारख्या इतक्या वर्षे राजकारणात असेलेल्या नेत्याला आपल काल केले हे माहिती असेल पण काल काय केले याची आठवण नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून तीन दिवसांसाठी सरकार स्थापन केले त्यांच्यावर टीका करताना काही तरी विचार करा. फडणवीसांनी काही तरी विचार करुन तुमच्यासोबत सरकार स्थापन केले. तुम्हाला तुमचे २८ आमदार सांभाळता न आल्यानं ते पवारांकडे परत . ज्याचे सरकार त्यांच्या सोबत तुम्ही जाणार असे तुमचे तत्व, ‘अजित दादा जरा सांभाळून बोला आम्ही फाटके आहोत बोलायला लागलो तर महागात पडेल’, असा इशाराही भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिला.


हेही वाचा – भ्रष्टाचार प्रकरण : परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे नाशिकमध्ये दाखल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -