घरताज्या घडामोडीअजित पवार शब्दाचे पक्के, त्यांनी पुन्हा आमच्यासोबत यावे, भाजपच्या नेत्याची ऑफर

अजित पवार शब्दाचे पक्के, त्यांनी पुन्हा आमच्यासोबत यावे, भाजपच्या नेत्याची ऑफर

Subscribe

फडणवीसांनी महाराष्ट्रात लवकर भाजपचे सरकार आणावे. उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टवक्ते आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत यावे अशी थेट ऑफर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला होता. याबाबत आताही चर्चा सुरु असते. महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद असून लवकरच हे सरकार कोसळेल असा इशारा भाजप नेत्यांकडून वारंवार देण्यात येतो. परंतु आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपकडूनच खुली ऑफर देण्यात आली आहे. अजित पवारांनी पुन्हा एकदा आमच्यासोबत यावे असे या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने म्हटलं आहे.

भाजप ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुली ऑफर दिली आहे. एक प्रकारे विखे पाटील यांनी अजित पवारांना भाजपमध्ये येण्याचे आवाहनच केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उत्तम प्रशासक आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. फडणवीसांनी महाराष्ट्रात लवकर भाजपचे सरकार आणावे. उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टवक्ते आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत यावे अशी थेट ऑफर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंकडे चुकीचे सल्लागार

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे फार संयमी आणि मितभाषी आहेत. त्यांनी आपल्या चुकीच्या सल्लागारांची साथ सोडली पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला आहे. आगामी काळात मंत्री नाही तर विरोधी पक्षनेता व्यायला आवडेल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय योग्य आणि आयुष्याला कलाटणी देणार होता. आम्ही वडिलांच्या विचाराने पुढे जात आहोत. आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत.

पवार कुटुंबियांत वैयक्तिक संघर्ष नाही

आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. त्यातून राजकीय मतभिन्नता आहे. पवार कुटुंबियांत कोणताही वैयक्तिक संघर्ष नाही असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुली ऑफर दिल्यामुळे राष्ट्रवादीकडून काय उत्तर देण्यात येईल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शिवसेना आमदार सुहास कांदे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, याचिकेवर 15 जून रोजी हायकोर्टात सुनावणी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -