घरताज्या घडामोडीपुरात वाहून गेलेल्या काशीद पुलाचे नामकरण

पुरात वाहून गेलेल्या काशीद पुलाचे नामकरण

Subscribe

स्वातंत्र्यवीर,समाजसेवक वा महान कार्य करणार्‍यांविषयीची कृतज्ञता म्हणून पुलास नावे दिली जातात.

११ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे काशीद येथील पूल कोसळून एकदरा येथील विजय चव्हाण यांचा मृत्यू झाला होता. या विरोधात भारतीय जनता पार्टीने आक्रमक होऊन पूल कोसळण्यास जबाबदार असणार्‍या अभियंता वर्गावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हा दक्षिण विभाग अध्यक्ष अ‍ॅड महेश मोहिते यांनी केली होती.त्यांच्या आक्रमकतेमुळे मुरुड पोलीस ठाण्यात सुद्धा गुन्हा दाखल झाला होता.आता तर त्यांनी चक्क काशीद पुलाचे नामकरण करून सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी नुकतेच काशीद पुलाचे स्वर्गीय विजय चव्हाण पूल असे नामफलक लावून उद्धघाटन केले.

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी अपघात झालेल्या ठिकाणी एकत्र येऊन प्रथम मृत्यू पावलेल्या विजय चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करून काशीद येथील पुलाच्या बाजूला मोठा फलक लावून चव्हाण यांचे नाव दिले. स्वातंत्र्यवीर,समाजसेवक वा महान कार्य करणार्‍यांविषयीची कृतज्ञता म्हणून पुलास नावे दिली जातात.परंतु भारतीय जनता पार्टीने येथे आक्रमक होऊन सर्वसामान्य गरीबाचे पुलास नाव देऊन एकच खळबळ माजवली. पुलाच्या नामफलकाचे अनावरणावेळी निलेश महाडिक, जयवंत अंबाजी, रोहन खोपकर, संदीप चिरायू, अजिक्य पाटील, भूमीत गाला आदी उपस्थित होते.

- Advertisement -

नामकरण हीच श्रध्दांजली

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अनास्थेमुळे एका गरीब कुटुंबातील कमावती व्यक्ती विजय चव्हाण यांचा मृत्यू झाला. त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी या पुलाचे नामकरण आम्ही त्यांच्याच नावाने केले आहे. पुलाचे नाव हीच खरी मृतात्म्यास आदरांजली ठरेल.


हेही वाचा  – पदवी परीक्षांसाठी CET परीक्षा नाही, १२वीच्या गुणांवरच पदवीचे प्रवेश – उदय सामंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -