कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाचे विरोधकांना पत्र

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपच्या विरोधात पोटनिवडणूक लढविली जाईल, असे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आले आहे. असं असतानाच आता कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून अधिकृत प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपाने त्यासंदर्भात विरोधकांना पत्र लिहिले आहे.

tripura assembly elections 2023 Tripura Election voting percentage polling booth bjp congress tipra motha tripura exit polls latest news

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपच्या विरोधात पोटनिवडणूक लढविली जाईल, असे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आले आहे. असं असतानाच आता कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून अधिकृत प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपाने त्यासंदर्भात विरोधकांना पत्र लिहिले आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी विरोधकांना पत्र दिले आहे. (Bjp Requested Opposition Parties To Make Kasba Peth Assembly Byelection Unopposed In Pune)

“महाराष्ट्राची अशी वैशिष्ट्यपूर्ण राजकीय संस्कृती आहे. सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपला पक्षानिवेश बाजूला ठेवून परस्परांशी उत्तम संबंध प्रस्थापित करतात. विकासकामात कधीच राजकारण येऊ देत नाहीत. तसेच निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर सर्वानुमते बिनविरोध निवडणूक केली जाते. राज्याची ही वैभवशाली परंपरा कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. या भूमिकेतून नुकतेच अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि मित्र पक्षांनी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार दिला नाही”, असे या पत्रात जगदीश मुळीक यांनी लिहिले आहे.

“राज्यसभेचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने विरोधकांच्या विनंतीला मान देत उमेदवार न देता बिनविरोध निवडणूक केली होती. त्याच प्रकारे शहरातील कसबा विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी. मुक्ता टिळक यांना तीच खरी आदरांजली ठरेल”, असेही या पत्रात लिहिण्यात आले आहे.

या पोटनिवडणुकीसाठी अद्याप भाजपा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. त्यामुळे भाजपच्या या आवाहनला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतील घटक पक्ष प्रतिसाद देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, राज्यातील पंढरपूर, कोल्हापूर येथील पोटनिवडणूक भाजपने बिनविरोध केली नसल्याचे दाखले महाविकास आघाडीने दिले आहेत.


हेही वाचा – आता मराठी माणूस आठवला का? प्रश्न विचारत सोमय्यांचा परबांवर हल्लाबोल