घरताज्या घडामोडीएक्झिट पोलच्या अंदाजात भाजपची सरशी

एक्झिट पोलच्या अंदाजात भाजपची सरशी

Subscribe

चार मतदारसंघांत विजयाची शक्यता

गेल्या महिनाभरापासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. यानंतर ‘पोल डायरी’ने या निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर केला. यामध्ये पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तीन पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातही भाजपलाच यश मिळेल. तर अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचा विजय होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.

‘पोल डायरी’ने पुण्यात भाजपच्या विजयाची शक्यता वर्तवली असली तरी पुणे पदवीधर मतदारसंघातील लढत खूपच चुरशीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात भाजपचा 100 टक्के विजय होईलच, अशी खात्री देण्यात आलेली नाही. तर धुळे-नंदुरबार या स्थानिक स्वराज्य संस्थेतील एका जागेवरही भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे ‘पोल डायरी’च्या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. मराठवाडा आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाचे निकाल पहिल्या फेरीतच स्पष्ट होतील. तर पुणे पदवीधर मतदारसंघात मात्र निकाल स्पष्ट होण्यासाठी दुसर्‍या फेरीची वाट पाहावी लागू शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे.

- Advertisement -

एक्झिट पोलचा हा अंदाज खरा ठरल्यास हा महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का असेल. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवल्याने भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. भाजपने एकट्याने हे आव्हान परतवून लावल्यास विरोधी पक्षाच्या आत्मविश्वासात भर पडेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -