घरताज्या घडामोडीशिल्पा शेट्टी स्विमिंग पूलमध्ये करतेय योगा!, पाहा व्हिडिओ

शिल्पा शेट्टी स्विमिंग पूलमध्ये करतेय योगा!, पाहा व्हिडिओ

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) नेहमी तिच्या कामाबद्दल सोशल मीडियावर शेअर करत असते. कधी शिल्पा डान्सचा व्हिडिओ तर कधी व्यायाम करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. शिल्पाचा आणखीन एक व्हिडिओ समोर आला आहे. तो सध्या व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये शिल्पा स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. यामध्ये शिल्पाने चक्क स्विमिंग पूलमध्ये काही योगाचे प्रकार देखील केले आहेत. शिल्पा शेट्टीच्या व्हिडिओ टीमने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

शिल्पाच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या लाईक्सचा आणि कॉमेंडचा पाऊस पडत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, शिल्पा आपले आयुष्य किती एन्जॉय करत आहे. शिल्पा हा पहिलाच व्हिडिओ नाही आहे, जो इतका व्हायरल होत आहे. यापूर्वी देखील शिल्पाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शिल्पा शेट्टी आगामी चित्रपट ‘हंगामा २’मध्ये (Hungama 2) दिसणार आहे.

- Advertisement -

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच शिल्पा ‘निकम्मा’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात शिल्पासोबत भाग्यश्रीची मुलगी अभिमन्यू दसानी आणि गायिका शर्ले सेतिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय शिल्पा अभिनेता परेश रावल आणि मीजान जाफरीसोबत ‘हंगामा २’मध्ये दिसणार आहे. बऱ्याच काळानंतर शिल्पा शेट्टीचे अनेक प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अलीकडेच शिल्पा शेट्टी झी ५ वरील ‘ब्लॅक विडोज’मध्ये दिसली होती.


हेही वाचा – अभिनेता शर्मन जोशीच्या वडिलांचे निधन


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -