Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम सख्खा भाऊ पक्का वैरी! दारुसाठी भावाच्या डोक्यात वरवंटा घालून केलं ठार

सख्खा भाऊ पक्का वैरी! दारुसाठी भावाच्या डोक्यात वरवंटा घालून केलं ठार

Related Story

- Advertisement -

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून झोपेतच मोठ्या भावाच्या डोक्यात वरवंटा घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील वागळे इस्टेट या ठिकाणी घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी लहान भावा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. रुपेश संपत मोरे (२३) असे हत्या करण्यात आलेल्या मोठ्या भावाचे नाव असून आरोपी गणेश मोरे (२२) हा लहान भाऊ आहे. रुपेश हा कुटुंबियांसह ठाण्यातील वागळे इस्टेट, अंबिका नगर येथे राहण्यास होता. रुपेशचा भाऊ गणेश याला दारुचे भयंकर व्यसन होते. घरच्यांनी त्याला नशा मुक्ती केंद्रात दाखल करून देखील त्याचे दारुचे व्यसन सुटले नव्हते.

कामधंदा नसल्यामुळे गणेशने दारू पिण्यासाठी मोठा भाऊ रुपेशकडे पैसे मागितले. मात्र दारू पिण्यासाठी पैसे देणार नाही असे बोलून रुपेशने पैसे देण्यास नकार दिला. भावाने पैसे दिले नाही म्हणून मद्यरात्री गणेशने झोपेत असलेल्या मोठा भाऊ रुपेशच्या डोक्यात वरवंट्याने प्रहार करून हत्या केली. त्यानंतर घराला बाहेरुन कुलूप लावून बॅग भरून पळ काढला होता. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी गणेश याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – दारूसाठी नाही तर लोकांनी आता लावल्या तंबाखू घेण्यासाठी लांबच लांब रांगा!


 

- Advertisement -