घरताज्या घडामोडीनेरळ बायपासचे दोन्ही पूल कोसळण्याच्या स्थितीत

नेरळ बायपासचे दोन्ही पूल कोसळण्याच्या स्थितीत

Subscribe

कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या नेरळ गावातून कळंब आणि कशेळे या मोठ्या लोकवस्तीच्या भागाकडे वाहने घेऊन जावे लागते.

नेरळ शहराचा बायपास म्हणून बांधण्यात आलेल्या नेरळ – दामत पेशवाई रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या मार्गावर नेरळ साई मंदिर ते दामत रेल्वे फाटक येथे सुमारे ४५ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या दोन्ही पुलाची चार वर्षात अत्यंत दुरावस्था झाली आहे. या पुलावरील सिमेंट काँक्रीटचा थर निघून गेले आहेत,येथील लोखंडी सळयासुद्धा या पुलावरील स्लॅब सोडून बाहेर पडल्या आहेत. दरम्यान,धोकादायक बनलेल्या या दोन्ही पुलांची स्थिती ही कधीही कोसळू शकणाऱ्या पुलांप्रमाणे झाली आहे. त्या संपूर्ण रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. त्यात पुलांची दुरुस्ती करण्यासाठी नेरळ प्राधिकरणाकडून मंजूर झालेले ३२ लाख खर्चाविना पडून आहेत.
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या नेरळ गावातून कळंब आणि कशेळे या मोठ्या लोकवस्तीच्या भागाकडे वाहने घेऊन जावे लागते. त्यामुळे नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्याच्या साईचौकातून -दामत फाटक असा पेशवाई मार्ग बांधण्यात आला. रायगड जिल्हा परिषद रायगडच्या नेरळ विकास संकुल प्राधिकरणाच्या माध्यमातून तब्बल ४.५ कोटी खर्च करून रस्ता आणि दोन पुलांची निर्मिती करण्यात आली. रस्त्यावरील दोन्ही पूल निकामी झाले असून रस्ता देखील खड्ड्यात हरवला आहे. नेरळ संकुल विकास प्राधिकरण योजनेतून साईमंदिर ते दामत रेल्वेफाटक या दोन पूलांच्या उभारणी साठी जिल्हा परिषदेने ४५ लाख रुपये खर्च केले. परंतु त्या दोन्ही पुलाची एक ते दीड वर्षातच दुरावस्था होऊन पूल बांधताना टाकण्यात आलेल्या स्लॅबच्या खालील बाजूस लावलेल्या लोखंडी सळया बाहेर डोके काढून सतत वाहनांचे टायर पंक्चर करीत असतात. दोन्ही पुलांवरील सिमेंट काँक्रीटचा थर केव्हाच निघून गेला आहे. त्यामुळे त्यातून बाहेर आलेल्या सळ्यांना चुकवायला वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. परंतु हे गेली वर्षभर सुरूच असून वाहनांची सततची वर्दळ यामुळे पूल निकामी झाले आहे.
या रस्त्याची देखील दुरावस्था होऊन जागोजागी रस्ता खचला देखील होता. त्यामुळे साधारण ६ ते ८ महिन्यांपूर्वी या रस्त्याची साधारण २० लाख रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली होती.त्याचवेळी पुलांची दुरुस्ती करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेमधील नेरळ विकास प्राधिकरणकडून ३२ लाखाचा कामाची निविदा निघाली.मात्र दोन्ही पुलांची दुरुस्ती काही झाली नाही.नेरळ शहरात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी बदलापूर,कल्याणहून येणारे वाहनचालक नेरळ पूर्व भाग, कशेळे, कळंब आदी ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून नेरळ-दामत-साईमंदिर पेशवाई रस्त्याचा वापर करत असतात.
                                                                                                               -ज्योती जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -