घरक्राइमप्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने केले खून, खोल खड्ड्यातून बाहेर काढले पाच मृतदेह

प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने केले खून, खोल खड्ड्यातून बाहेर काढले पाच मृतदेह

Subscribe

तब्बल १० फूट खोल खोदल्यानंतर पाच मृतदेह पोलिसांच्या हाती

प्रेमात पडल्यावर भांडणे होतात. मात्र या भांडणांमुळे थेट हत्याकांडाची घटना समोर आली आलीय. पाच जणांची हत्या करुन त्यांना एकाच ठिकाणी गाडण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशच्या देवास मधून समोर आली आहे. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने हे हत्याकांड केल्याचे पोलिसांनी तपासादरम्यान सांगितले. सुरेंद्र चौहान असे हत्याकांड करणाऱ्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून त्याने हे हत्याकांड केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले आहे. देवासे जिल्ह्यात असणाऱ्या नेमावरमध्ये एका शेतात पोलिसांना मंगळवारी जमिनीत खोल कड्ड्यात पाच मृतदेह आढळून आले. १३ मे पासून हे पाच जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या. हे पाच मृतदेह त्या बेपत्ता असलेल्या लोकांचे असल्याचे समोर आले. (Boyfriend killed Five people Becaue girlfriend troule in Madhya pradesh)

१३ मे रोजी बेपत्ता झालेल्या पाच जणांचा पोलीस शोध घेत होते. यात एक महिला, तीन तरुणी आणि एका तरुणाचा समावेश होता. आरोपी सुरेंद्र चौहान याने त्याच्या मेला रस्त्यावर असलेल्या शेतात हे पाच मृतदेह खोल खड्डा खणून पुरले होते. पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाड टाकली. जमिनीच्या खाली काही तरी पुरल्याचा पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करण्यात सुरुवात केली असता तब्बल १० फूट खोल खोदल्यानंतर पाच मृतदेह पोलिसांच्या हाती लागले.

- Advertisement -

पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या पाच साथीदारांना ताब्यात घेतले आहे. या हत्याकांडात मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये ४ महिला आणि एका पुरुषांचा समावेश आहे. ममता मोहनलाल कास्ते (४५), रुपाली मोहनलाल (२१) दिपाली मोहनलाल (१४) पूजा रवी ओसवाल (१५) आणि पवन रवि ओसवाल अशी मृतांची नावे आहेत. पोलीस या तपासाची कसून चौकशी करत आहेत. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून दोन कुटुंबातील सदस्यांची आपण हत्या केल्याचे आरोपी कबूल केले आहे.


हेही वाचा – बापाने घेतला पोटच्या पोरांचा जीव, आईस्क्रीममधून दिलं ३ मुलांना उंदराचं औषध

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -