मेव्हण्याने मेव्हणीचा खून करुन आत्महत्या केली; कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल

brother in law killed her sister in law then committed suicide in Phagwara at Punjab
मेव्हण्याने मेव्हणीचा खून करुन आत्महत्या केली; कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल

मेव्हण्याने सासरी जाऊन मेव्हणीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर मेव्हणीचा खून केल्यानंतर मेव्हणाने स्वतःचा जीव संपवून घेतला आहे. मेव्हणीने फोन उचलला नाही यामुळे मेव्हणाने रागाच्या भरात हे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे. ही घटना पंजाबमधील फगवारा गावातील खेड्यात झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली.

याप्रकरणाबाबत एस.एच.ओ सतनामपुरा उषा रानीने सांगितले की, ‘मृतक मुलीचे नाव प्रवीण (वय ३२) असून मृत मेव्हण्याचे नाव बोधराज (वय ४०) अशी ओळख पटली आहे. बोधराज सकाळी प्रवीणला फोन करत होता. पण तिने फोन उचलला नाही. मग तो स्वतः सासरी पोहोचला. त्याने सासरी पोहोचताच प्रवीणला स्वयंपाक घरातून खेचून एका खोलीत घेऊन गेला. त्यानंतर त्याने दरवाजा लावून तिचा खून केला आणि मग त्याच खोलीत त्याने ओडणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

एस.एच.ओ पुढे म्हणाल्या की, ‘शरिरावर कोणत्याही खूना आहे की नाही, तिला मारहाण करण्यात आली आहे की नाही? याबाबत पोस्टमार्टम अहवाल आल्यावर कळेल. सध्या मृतदेह पोलिसांच्या ताब्यात असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहेत.’


हेही वाचा  – पत्नीचं मुंडकं घेऊन हैवान २ किलोमीटर चालतचं राहिला, मग गाठलं पोलीस ठाणं!