घरठाणेमुंबईतील विक्रोळी, चेंबूर, भांडूप दुर्घटनेनंतर मुसळधार पावसामुळे ठाण्यात इमारतीची कोसळली भिंत

मुंबईतील विक्रोळी, चेंबूर, भांडूप दुर्घटनेनंतर मुसळधार पावसामुळे ठाण्यात इमारतीची कोसळली भिंत

Subscribe

सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नाही.

मुसळधार पावसामुळे मुंबईत दुर्घटनांचं सत्र सुरुच आहे. शनिवारी आणि रविवार हा मुंबईसाठी काळरात्र ठरला आहे. विक्रोळी, चेंबूर, भांडूप दुर्घटनेनंतर मुसळधार पावसामुळे ठाण्यात रविवारी रात्रीच्या सुमारास इमारतीची भिंत कोसळल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नाही आहे, मात्र गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

नक्की काय घडले?

ठाणे घोडबंदर रोडवरील मानपाडा मुल्ला परिसरात असणाऱ्या कॉसमॉस इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. रविवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून यामध्ये भिंत कोसळून पाच कार आणि पाच दुचाकीचे नुकसान झाले आहे. घडनेची माहिती मिळताच अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन दलाच्या पथकासोबत जेसीबी दाखल झाले होते. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवतहानी झाली नाही आहे.

- Advertisement -

वीकेंच्या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू

शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे एकीकडे रस्ते, घरं जलमय होत आहेत, तर दुसरीकडे भिंत आणि दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडताना दिसत आहे. मुंबईत शनिवारी मध्यरात्री आणि रविवार विक्रोळी, भांडूप, चेंबूर, चांदीवली येथे भिंत आणि दरड कोसळल्याच्या घडना घडल्या आहेत. यामध्ये चारही दुर्घटनेत एकूण ३० जणांचा मृत्यू झाला असून ८ जखमी झाले आहेत.

अंधेरी, कांदिवलीत शॉक लागून दोघांचा मृत्यू

मुसळधार पावसात अंधेरी (प.) एस. व्ही. रोड येथील फिरदौस मिठाईवाला यांच्या दुकानात शनिवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉक लागून मोहम्मद सलीम पटेल (२६) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला घटनेनंतर तात्काळ जवळच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटे ४.१५ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तसेच कांदिवलीतील रितेश चंद्रकिशोर यांचा देखील शॉक लागून मृत्यू झाला. याप्रकरणी डी.एन नगर आणि समतानग पोलिसांनी दोन स्वतंत्र अपमृत्यूची नोंद केली आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -