घरताज्या घडामोडीदाखल्यांसाठीची धावपळ थांबणार, पनवेलमध्ये १२ ऑक्टोबरपर्यंत दाखले वाटप शिबिर

दाखल्यांसाठीची धावपळ थांबणार, पनवेलमध्ये १२ ऑक्टोबरपर्यंत दाखले वाटप शिबिर

Subscribe

कोरोनाच्या काळात अशा प्रकारचे शिबिर आयोजित झाले नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय झाली होती.

पनवेल तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी व नागरिकांसाठी खारघर, सुकापूर, कळंबोली, आजिवली, कामोठे आणि गव्हाण या सहा ठिकाणी शासकीय विविध दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमेसाईल, आधारकार्ड, वय व अधिवास, अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना पनवेल तहसील कार्यालयात फेर्‍या माराव्या लागतात, अशा परिस्थितीत वेळ आणि आर्थिक भुर्दंड पडत असतो, त्यामुळे नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात अशा प्रकारचे शिबिर आयोजित झाले नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय झाली होती, परंतु आता ती दूर झाली आहे. शिबिरामध्ये रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल, वय व अधिवास दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, शालेय विद्यार्थ्यांसाठी आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्ती हे दाखले दिले जाणार आहेत.

शिबिरांचे ठिकाण

१६ सप्टेंबर सकाळी ११ वाजता, खारघर रामशेठ ठाकूर कॉलेज
१७ सप्टेंबर सकाळी ११ वाजता, सुकापूर लक्ष्मी पब्लिक स्कूल.
२४ सप्टेंबर सकाळी ११ वाजता, कळंबोली- नवीन सुधागड हायस्कूल
०१ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता, आजिवली हायस्कूल
०८ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता, कामोठे- सुषमा पाटील विद्यालय
१२ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता, गव्हाण- छत्रपती शिवाजी हायस्कूल

- Advertisement -

हे ही वाचा – माजी मंत्री म्हणू नका दोन दिवसांत कळेल, चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळे चर्चांना उधाण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -