घरताज्या घडामोडी'नको वेफर्स नको कुरकुरे, आम्हाला आमचे जंगलच बरे', वन्यजीव संरक्षणासाठी मुंबई-गोवा महामार्गावर...

‘नको वेफर्स नको कुरकुरे, आम्हाला आमचे जंगलच बरे’, वन्यजीव संरक्षणासाठी मुंबई-गोवा महामार्गावर साखळी आंदोलन

Subscribe

प्रशासनाचा केला निषेध.

रायगड जिल्ह्यातील एकमेव मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा पक्षी अभयारण्यात पक्षी, प्राणी सुरक्षित नसल्याची बाब वारंवार समोर येत असून, लाख रुपये खर्च करून महामार्गावर प्राणी येणार नाहीत त्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तांत्रिकदृष्ट्या फोल ठरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वन्य जीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी रविवारी कर्नाळा खिंडीत मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.

अभयारण्याच्या शेजारी महामार्गावर प्रवास करताना पर्यटक आपल्या आनंदासाठी मानवी खाद्यपदार्थ पक्षी, प्राण्यांना खायला देतात. ते खाद्यपदार्थ खाण्यासाठी माकडे आणि काही पक्षी महामार्गावर येतात आणि त्याच वेळी अपघातात जखमी होऊन पक्षी प्राण्यांचा जीव जातो. याचा निषेध नोंदवण्यासाठी कोकण कट्टा (विलेपार्ले) आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था (बांगरवाडी-पनवेल), पंख फाऊंडेशन (पेण) यांच्यासह इतर सामाजिक संस्थांच्यावतीने मानवी साखळी उभारण्यात आली. जवळपास 200 ते 300 कार्यकर्ते महामार्गाच्या कडेला उभे राहून जनजागृती करीत होते. यावेळी विविध ६ मागण्याही करण्यात आल्या.

- Advertisement -

एखादा प्राणी-पक्ष्याला जखम किंवा काही झाले तर त्याच्या उपचारासाठी तेथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, स्पीडब्रेकर लावण्यात यावेत, बेशिस्त पर्यटकांवर महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कारवाई करावी, वन विभागाने बेताल पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावावे, या काही प्रमुख मागण्यांचा त्यात समावेश आहे. या मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.यावेळी संतोष ठाकूर, अजित पितळे, सुजित कदम उपस्थित होते.


हे ही वाचा – महाराष्ट्रात पेढे वाटणाऱ्यांना लाज नाही वाटत? संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -