घरताज्या घडामोडीLive Update: नाना पटोलेंनी अतिथीगृहावर घेतली एच. के. पाटील यांची भेटे

Live Update: नाना पटोलेंनी अतिथीगृहावर घेतली एच. के. पाटील यांची भेटे

Subscribe

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल आभार मानले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी वामशी रेड्डी आणि आशिष दुआ उपस्थित होते.


वाशी न्यायालयाकडून राज ठाकरेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. राज ठाकरे  आज वाशी न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित झाले आहेत. राज ठाकरेंकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशी न्यायालयात दाखल झाले आहेत. न्यायालयाच्या बाहेर मनसे कार्याकर्त्यांची गर्दी पहायला मिळत आहे. वाशी न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे.


नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आज (शनिवार) वाशी न्यायालयात हजर राहणार आहेत. विशेष म्हणजे, राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली आहे.

- Advertisement -

दाक्षिणात्य अभिनेत्री खुषबू सुंदर ही आज भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ चंद्रकांतदादा पाटील यांची दुपारी २ वाजता सदिच्छां भेट घेणार आहे.


राज ठाकरे आज वाशी कोर्टात हजर राहणार आहेत. टोलकृष्णकुंजावर मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे राज ठाकरे आज ६ फेब्रुवारी २०२०१ रोजी सकाळी ११ वाजता वाशी न्यायालयात हजर राहणार आहेत. २६ जानेवारी २०१४ रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.


मानखुर्दच्या मंडाला येथे काल दुपारी भीषण आग लागली. तब्बल १४ तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या दवानांना यश आले आहे. या आगीत काल एका मृत्यूही झाला होता. आग आटोक्यात आल्याने आता कुलिंगचे काम सुरु केले आहे. या आगीत ४० ते ५० गोदामे जळून खाक झाली आहेत.


आज देशभरात शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन होणार आहे. दुपारी १२ ते ३ पर्यंत राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम असणार आहे. राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेनेचाही पाठिंबा असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -