घरताज्या घडामोडीचक्रीवादळामुळे विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

चक्रीवादळामुळे विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

Subscribe

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले निवार चक्रीवादळाचे बुधवारी तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले असून ते मध्यरात्री अथवा पहाटे तामिळनाडुच्या किनारपट्टीवर धडकणार आहे़. त्यामुळे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पाँडेचरीमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सध्या हे चक्रीवादळ पाँडेचरीपासून 190 किमी अंतरावर आहे. ते मध्यरात्री अथवा पहाटे कराईकल आणि मल्लापूरम दरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे़. यामुळे तामिळनाडू, पाँडेचरी परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ जमिनीवर आल्यावर त्याचा जोर कमी होण्याची शक्यता असून 26 नोव्हेंबरला त्याची तीव्रता कमी होऊन काही तासांनंतर ते शांत होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राज्यात मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़. त्याचवेळी विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान परभणी येथे 12़2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

विदर्भातील भंडारा जिल्ह्यात 26 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात 25 ते 27 नोव्हेंबर तसेच वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात 26 व 27 नोव्हेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.गोंदिया, वर्धा, नागपूर, बुलढाणा, अमरावती, अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात 26 नोव्हेंबरला पावसाची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -