घरताज्या घडामोडीChhat puja 2021 : परप्रांतिय माणगांववासियांनी काळनदी किनारी साजरी केली छटपूजा

Chhat puja 2021 : परप्रांतिय माणगांववासियांनी काळनदी किनारी साजरी केली छटपूजा

Subscribe

महाराष्ट्रीय लोक संक्रांतीला जशी सुर्याची उपासना करतात, त्याप्रमाणे उत्तर भारतीय लोक कार्तिक महिन्याच्या शुक्ल षष्ठीपासून अर्थात दिवाळीनंतर छठ पूजा करतात.

उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, नेपाळचे मुळनिवासी असलेले अनेक परप्रांतिय नोकरी-धंद्यानिमित्त अनेक ठिकाणी जात असतात. त्याचप्रमाणेच अनेक परप्रांतिय माणगावात येथे येऊन माणगांववासिय झाले आहेत. बुधवार १० नोव्हेंबरला रोजी सुर्यास्ताचे वेळी आणि गुरुवार ११ नोव्हेंबरला सुर्योदयाच्यावेळी या हिंदूधर्मिय परप्रांतियांनी माणगांवच्या काळनदी किनारी महिला, पुरुष लहान मुल-मुली एकत्र जमुन जल्लोषात छठपूजा साजरी केली. यावेळी विशेष नटुनथटुन आलेल्या महिलांनी कपाळी कुंकू, भांगात ठसठसित सिंदूर भरुन डोक्यावर पदर, हाती छठपुजेचे साहित्य असलेल सुपडे घेऊन नदीचे पात्रात उतरुन पाण्यात उभे राहून सुर्यदेवतेला अर्घ्य देत मनोभावे उपासना केली.

…म्हणून याला सुर्य षष्ठी पुजा असेही म्हणतात

छठ पूजेचे कठीण व्रत करणारे भाविक सुर्यदेवतेला अर्घ्य देऊन या दिवशी ३६ तासांचा निर्जल उपास करतात. या व्रतामुळे भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. संतानप्राप्ती, पुण्यसंचय, सुखसमृध्दीसाठी ही पूजा केली जाते अशी या लोकांची श्रध्दा आहे. वेदपुराणातील माहितीनुसार सुर्य व सुर्यदेवाची बहिण छठ देवीला प्रसन्न करण्यासाठी ही पूजा केली जाते. महाराष्ट्रीय लोक संक्रांतीला जशी सुर्याची उपासना करतात, त्याप्रमाणे उत्तर भारतीय लोक कार्तिक महिन्याच्या शुक्ल षष्ठीपासून अर्थात दिवाळीनंतर छठ पूजा करतात. याला सुर्य षष्ठी पुजा असेही म्हणतात.

- Advertisement -

छठ पूजेचा सुरवात सुर्यपुत्र कर्णाने आपल्या कवच-कुंडलांची शक्ती वाढविण्यासाठी केली होती. कर्ण रोज सकाळी पाण्यात उभा राहून सुर्यदेवाची उपासना करत सुर्याला अर्घ्य देऊन मगच दिवसाची सुरुवात करत असे. महाभारतातील राजकारणात द्युतात सर्वकाही गमावलेल्या पांडवांना त्यांचे गतवैभव परत मिळावे, म्हणून द्रौपदीने देखील सुर्याची उपासना केली. सुर्य देवांच्या आशीर्वादाने तिची मनोकामना पूर्ण झाली.

छठ पुजेची परंपरा आता सर्वदूर पसरली

विशेष म्हणजे बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, नेपाळ या प्रदेशातील लोक आता जगभर पसरल्यामुळे त्यांचे सोबत छठ पुजेची परंपरा आता सर्वदूर पसरली आहे. सुर्यप्रकाशाचे महत्त्व जाणून आपल्या संस्कृतीने सुर्योपासना व सुर्यनमस्काराचे संस्कार घातले आहेत. दिवाळीचा कालावधी थंडीचा. अशात उबदार किरणांनी शरीराला हायसे वाटावे, सर्दी, ताप यांसारख्या किरकोळ आजारांपासून सुटका व्हावी, यादृष्टीनेही छठ पुजेचे महत्त्व लक्षात घेतले जाते.

- Advertisement -

वार्ताहर – रविंद्र कुवेसकर


हे ही वाचा – Vitthal Rukmini Darshan : जेष्ठ नागरिक, गर्भवती महिलांनाही मिळणार पंढपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरात प्रवेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -