Homeक्राइमSambhajinagar : पोलिसांना शिवीगाळ करणं पडलं महागात; बिल्डर कुणाल बाकलीवालावर गुन्हा दाखल

Sambhajinagar : पोलिसांना शिवीगाळ करणं पडलं महागात; बिल्डर कुणाल बाकलीवालावर गुन्हा दाखल

Subscribe

अनेकदा रस्तेमार्गावर पोलीस आणि वाहनचालक यांच्यात वाद होताना पाहायला मिळतं. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास किंवा वाहतूक पोलिसांच्या चुकीमुळे आपापसात वाद होतात. मात्र, बऱ्याचदा वाहन चालक आपली ताकद दाखवण्याच्या नादात पोलिसांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण करतात. पण पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण करणं कायद्याच्याविरोधात आहे.

संभाजीनगर : अनेकदा रस्तेमार्गावर पोलीस आणि वाहनचालक यांच्यात वाद होताना पाहायला मिळतं. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास किंवा वाहतूक पोलिसांच्या चुकीमुळे आपापसात वाद होतात. मात्र, बऱ्याचदा वाहन चालक आपली ताकद दाखवण्याच्या नादात पोलिसांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण करतात. पण पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण करणं कायद्याच्याविरोधात आहे. त्यामुळे अनेक वाहन चालकांना पोलीस थेट कारवाईच्या कचाट्यात उभे करतात. अशीच घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील मिल कॉर्नर चौक परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालकावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. (chhatrapati sambhjinagar arrogant builder kunal bakliwal faces action for abusing police fir)

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर शहरातील मिल कॉर्नर चौकात काळ्या चार चाकीमध्ये बिल्डर कुणाला बाकलीवाल प्रवास करत होता. प्रवासावेळी कुणाला बाकलीवालने हॉर्न आणि सायरन वाजवून चारचाकी रस्त्याच्या मधोमध उभी केली. त्यावेळी वाहचुकीच्या मार्गात अडथळा येत असल्याने पोलिसांनी त्याला थांबवलं. त्यावेळी वाहन चालक कुणाला बाकलीवाल याने चूक कबूल करायचं सोडून पोलिसांनाच शिवीगाळ केली. त्यावेळी त्याने ‘साहेबांशी बोल’ म्हणत फोन त्या पोलिसांच्या दिशेने नेला. तसेच, तू मला ओळखले नाही का? बुढ्ढे तेरे को ड्युटी करनी आती है क्या.. ‘गप्प बस’ असं पोलिसांना म्हणत दोन तासात तुम्हाला सस्पेंड करेन अशी धमकी दिली. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

गुन्हा दाखल

याप्रकरणी कुणाल बाकलीवालवर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान, पेशाने बिल्डर असणाऱ्या कुणाल बाकलीवालचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांना शिविगाळ केल्याप्रकरणी कुणालवर भारतीय न्याय संहिता कलम 132, 352, 351 (2) सह मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 100(2), 177, 119 (2) 177 प्रमाणे कायदेशीर फिर्यादी अंतर्गत पुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – Palghar News : शिंदे गटाचे पदाधिकारी आठ दिवसांपासून बेपत्ता, कुटुंबीयांकडून धक्कादायक दावा अन्…