घरठाणेमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची Naayak स्टाईल कारवाई, रस्ते कंत्राटदाराला जागेवर बजावली नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची Naayak स्टाईल कारवाई, रस्ते कंत्राटदाराला जागेवर बजावली नोटीस

Subscribe

ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे राज्यात सरकार राज्यात आल्यापासून ते कायम सांगत आले आहेत, की हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. सर्वसामान्य जनतेलाही हे सरकार आपलं वाटावं असे अनेक निर्णय देखील शिंदेंकडून घेण्यात आले आहेत. त्यासोबतच आता शिंदे हे ‘नायक’ स्टाईल निर्णय घेतानाही दिसत आहेत. ठाण्यात रस्ते कामांची पाहाणी करताना कामगारांना पुरेशी सुरक्षा पुरवलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तत्काळ कंत्राटदाराला नोटीस बजावल्याची घटना समोर आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी परवा मुंबईतील नालेसाईफाईची पाहणी केली. यावेळी त्यांनी नाल्यात उतरून कर्मचाऱ्याशी बोलून सफाईचा आढावा घेतला होता. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील रस्ते विकास कामांची पाहणी केली. टिकूजीनी वाडी सर्कल येथे सुरू असलेल्या रस्ताच्या डांबरीकरण कामाची पाहणी करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले.

- Advertisement -

कामासोबत कामगारांच्या सुरक्षेलाही महत्त्व 
यावेळी या कंत्राटदाराने कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने, हॅन्ड ग्लोव्हज, हॅल्मेट इत्यादी दिलेली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी याची तातडीने दखल घेऊन कंत्राटदारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. रस्त्यांची कामे होणे हे जितके महत्वाचे आहे, तेवढेच तो रस्ता तयार करण्यासाठी राबणारे कामगार सुरक्षित राहणे महत्वाचे असल्याचे सांगितले. रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला तत्काळ कामगारांच्या सुरक्षेची सामुग्री देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी खडसावले. तसेच त्यांच्यावर याबाबत कारवाई करण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांना दिले. या कंत्राटदाराचे नाव कळू शकलेले नाही.

‘नायक’ स्टाईल कारवाई
मुख्यमंत्री शिंदे सध्या अॅक्शनमोडमध्ये आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालामुळे शिंदे-फडणवीस सरकार तरले आहे. त्यानंतर शिंदे हे अधिक जोमाने कामाला लागल्याचे राज्यात चित्र आहे. नायक (Naayak) सिनेमात अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) हा २४ तासांसाठी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी ते रस्ते, नालेसफाई, रेशन दुकान, रुग्णालय यांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करतो. सर्वसामान्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा त्यांच्यापर्यंत पोहचतात की नाही याचा आढावा घेतो. ही पाहणी करत असताना कामात कुचराई करणारे अधिकारी, मापात पाप करणारे कंत्राटदार, रेशनदुकानदार यांच्यावर एक दिवसांचा मुख्यमंत्री निलंबित, बडतर्फीची झटपट कारवाई करतो. मुख्यमंत्री शिंदे देखील सध्या नायक स्टाईल कारवाई करताना दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -