घरताज्या घडामोडीMurud : मुरुडमध्ये मूलभूत समस्यांचे तीन तेरा ; नागरिक हैराण

Murud : मुरुडमध्ये मूलभूत समस्यांचे तीन तेरा ; नागरिक हैराण

Subscribe

मुरुड नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड

वेगवेगळ्या कारणांमुळे मुरुड शहरातील मूलभूत समस्यांचे अक्षरशः तीन तेरा वाजल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले असून, याकडे एकही लोकप्रतिनिधींने गांभीर्य दाखविले नसल्याचा उघड आरोप होत आहे. पाणी, रस्ते यासह इंटरनेट सेवा, एसटी सुविधा यामध्ये सध्या आनंदी आनंद असल्यासारखी परिस्थिती आहे. मुरुड ते अलिबाग रस्त्याची दुर्दशा झालेली असताना त्या मार्गावरून शहरात आल्यानंतर अंतर्गत रस्त्यांवरूनही वाहनांना खड्डे चुकवत पुढे जावे लागते. मुरुड हे रायगडचे एक टोक असल्याने, तसेच जलवाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे प्रवासासाठी एसटीच्या सेवेवरच अवलंबून रहावे लागते. येथील स्थानकातून दररोज ४५ ते ४८ फेर्‍या आहेत. मात्र पुरेश्या बस नसल्याने वेळेचे गणित पुरते कोलमडले असून, प्रवाशांना खासगी वाहने किंवा रिक्षांचा आधार घ्यावा लागत आहे. यात नाहक आर्थिक भुर्दंड पडत असतो. आगार असूनही अनेक बस गळक्या आहेत, हे एक वैशिष्ट्य आहे.

पारंपारकि बीएसएनएलसह नंतर आलेल्या कंपन्यांच्या नेटवर्क सेवेमध्ये वारंवार अडथळा येत असल्यामुळे अनेकदा मोबाईल ही शोभेची वस्तू ठरत आहे. नेटवर्क धडपणे नसल्याने पेंशनची रक्कम बँकेत काढण्यासाठी येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना तासन्तास ताटकळत रहावे लागते. आजूबाजूच्या गावांतून येणार्‍यांना अनेकदा दोन-तीन चकरा माराव्या लागतात. शहरासह तालुका हे पर्यटन स्थळ असल्याने इंटरनेट सेवा प्रभावी करा, ही मागणी फक्त मागणीच राहिली आहे. दुसरीकडे अलिबाग ते मुरुडचा दुवा असलेला साळाव पूल धोकादायक अवस्थेत असल्याने वरवरच्या मलमपट्टीवर वेळ मारून नेण्यात धन्यता मानली जाते. या पुलाला प्रशस्त पर्यायी पूल असावा, यासाठी कोणताही राजकीय पक्ष आग्रही नाही.
योग्य नियोजन नसल्यामुळे गारंभी, सवतखडा, खारआंबोली यापैकी खारआंबोली या एकाच धरणातून शहराला पाणी येत आहे. मात्र ते अनेकदा फिल्टर केलेले नसल्यामुळे नागरिकांना पाणी उकळून प्यावे लागते. नबाबकालीन गारंभी आणि सवतखडा धरणाच्या पाण्याचे योग्य ते नियोजन केले तर खांरआबोली धरणाच्या पाण्याची आवश्कता लागणार नाही, असे नागरिकांना वाटते. आरोग्य सुविधेतही साराच प्रकाश आहे. दोन सरकारी रुग्णालये असून नसल्यासारखी आहेत. सीटी स्कॅन, आयसीयु, व्हेंटिलेटरसारख्या सुविधा फक्त चर्चेपुरत्या असल्यामुळे अत्यवस्थ रुग्णाला रोहे, माणगाव किंवा थेट मुंबईत न्यावे लागते. यात रुग्णाच्या प्राणावरही बेतू शकते. तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा पाचवीला पुजलेली आहे.

- Advertisement -

विजेचा गोंधळ आणि मुरुड शहर हे घट्ट नाते आहे. अनेकदा वीज गेल्याशिवाय शहरवासीयांना चैन पडत नाही. शहरामध्ये सब स्टेशनच्या नावाखाली स्विच स्टेशन चालू केले आहे. तरीही विजेचा लपंडाव सुरूच आहे. पक्षाच्या झुली उतरवून शहरातील नेते, कार्यकर्ते एकत्र येत नसल्याने येणार्‍या नेत्यांच्या भाषणातील आश्वासनांच्या गुलाबी चित्रात नागरिकांना रमावे लागत आहे.

त्यामुळे या ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग मिळावा, अशी मागणी मनसेने केली आहे. यापूर्वी या ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या असून नवनिर्माण चौपदरी महामार्गावर शाळा सूटतेवळी विधार्थ्यांची रस्त्यावर मोठी वर्दळ असते तसेच नागरिकांची रेलचेल असल्याने सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी पर्यायी मार्गिकेची अत्यंत आवश्यकता आहे. आतापर्यंत हजारावर नागरिक आणी विद्यार्थ्यानी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदविला असून, लवकरच सह्यांचे पत्र महामार्ग बांधकाम विभागाच्या महाड कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांना देणार असल्याची माहिती मोहिरे यांनी दिली.

- Advertisement -

 

                                                                                  वार्ताहर -गणेश चोडणेकर


हे ही वाचा – Cruise Drugs Case: आर्यन खानचा जामीन फेटाळला; वकिलांची हायकोर्टात धाव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -