घरताज्या घडामोडीपूरामुळे वाहून आलेले ड्रम पळवण्याची नागरिकांची घाई

पूरामुळे वाहून आलेले ड्रम पळवण्याची नागरिकांची घाई

Subscribe

पुराच्या पाण्यातून कारखान्यातील वाहून आलेले ड्रम वापरण्यास धोकादायक मात्र,बॅरल गोळा करण्यासाठी स्थानिकांची नदीकडे धाव

महाडमधील दुर्घटनेमुळे गावेच्या गावे उध्वस्त झाले. या दुर्घटनेचा महाड औद्योगिक क्षेत्राला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. येथील रासायनिक कारखान्यामधील रसायन वापरातील ड्रम पुराच्या पाण्यात वाहून गेले. स्थानिक नागरिक आणि भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तींकडून हे ड्रम गोळा केले जात आहेत. मात्र हे ड्रम दैनंदिन वापरासाठी धोकादायक ठरू शकतात असे मत औद्योगिक क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले आहे.
महाड एम.आय.डी.सी. मध्ये कधी नव्हे इतके पुराचे पाणी आले. काळ नदीचे पाणी आसनपोई आणि काळीजजवळ गावातून शिरले. त्यानंतर हे पाणी औद्योगिक क्षेत्रात पसरले. यापूर्वी देखील पूर आला पण कारखान्याच्या परिसरात जेमतेम दोन ते चार फूट पाणी गेले होते. यावेळी मात्र पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली. आणि घराएवढ्या आकाराचे रिऍक्टर आडवे केले. कारखान्यांच्या आवारातील यांत्रिक सामान, कच्चा पक्का माल, आणि ड्रम मोठया प्रमाणात वाहून गेले. पूर थांबताच नदीच्या आणि कारखान्यांच्या परिसरात नाल्यात रिकामे आणि रासायनिक उत्पादनाने भरलेले ड्रम अडकून पडलेले दिसताच परिसरातील नागरिकांनी हे ड्रम पकडण्यासाठी एकच गर्दी उसळली होती.
महाड औद्योगिक वसाहती मधील कारखान्यांच्या या बहुधा रासायनिक उत्पादन करणारे कारखाने आहेत. त्यामुळे कारखान्यांना लागणारा रासायनिक कच्चा माल आणि तयार रासायनिक उत्पादनाकरिता या ड्रम चा वापर होतो. बहुतांश रासानिक पदार्थ हे मानवी जीवनास धोकादायक ठरतात. यामुळे या ड्रम चा दैनंदिन जीवनात वापर देखील धोकादायक ठरू शकतो. कोणत्या ड्रम मध्ये कोणत्या प्रकारचे रसायन होते हे सर्वसामान्य माणसाला कळणे कठीण आहे. या बॅरल मधून पाणी वापर देखील जीवावर बेतू शकते. औद्योगिक क्षेत्रात नाल्यातील आणि नदीतील बॅरल उचलण्यास स्थानिकांनी धाव घेतली होती. बहुतांश बॅरल मधून द्रव आणि पावडर स्वरूपातील रसायन येते यामुळे असे बॅरल दैनंदिन जीवनात वापर करण्यास धोकादायक ठरू शकते,असे महाडमधील लक्ष्मी ऑरगॅनिकचे सदस्य उदय वैंशपायन यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -