एकाच दिवशी दीड कोटीच्यावर कर संकलन : नागरिकांनी वेळेत कर भरावा – पनवेल महानगरपालिका

पनेवल महानगरपालिकेने सुधारीत मालमत्ता कर आकारणीला सुरूवात केली आहे.

Citizens should pay taxes on time: Panvel Municipal Corporation
एकाच दिवशी दीड कोटीच्यावर कर संकलन नागरिकांनी वेळेत कर भरावा - पनवेल महानगरपालिका

पनेवल महानगरपालिकेने सुधारित मालमत्ता कर आकारणीला सुरूवात केली. गेले काही दिवसापासून खारघरमध्ये मालमत्ता करांवर प्रशासनाच्यावतीने नागरिकांच्या सुनावण्या घेण्यात येत आहे. नागरिकांच्या सर्व शंकाचे निरसन होत आहे.त्यामुळे मालमत्ता कर योग्य असल्याबद्दलची खात्री त्यांना पटत असल्याने मालमत्ता भरणामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होत असल्या कारणाने पनवेल महानगरपालिकेच्या कर संकलनात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काल २६ जुलैला एकाच दिवशी तब्बल १ कोटी ५६ लाख ५३ हजार ८८६ रुपयांचे कर संकलन झाले. आत्तापर्यंत एकुण २२ कोटी २६ लाख ७० हजार ६२७ रूपयांचे कर संकलन झाले असून नागरिकांचा कर भरण्यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून येत आहे. दरम्यान महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाप्रमाणे ३१ मार्च २०२३ च्या ऐवजी ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या कालावधीमध्ये कोणतीही शास्ती ,दंड, व्याज आकारण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी वेळेत कर भरावा असे आवाहन आयुक्त  गणेश देशमुख यांनी केले आहे.

गेले काही दिवसापासून खारघरमध्ये मालमत्ता करांवर प्रशासनाच्यावतीने नागरिकांच्या सुनावण्या घेण्यात येत होत्या. गेल्या शुक्रवारी(२३ जुलै) या सुनावण्या पुर्ण झाल्या असून या वेळी नागरिकांच्या सर्व शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न पालिकेच्यावतीने करण्यात आला. तसेच गेल्या शनिवार, रविवार सुट्ट्यांच्या दिवशी खारघरमधील उन्नती को. ऑपरेटिव्ह सोसायटी,प्लॉट नं ६९, शहा आर्केड, गॅलेक्सी अपार्टमेंट, सेक्टर ३५ याठिकाणी नागरिकांच्या मालमत्ता करासंदर्भात बैठका घेण्यात आल्या. यावेळी नागरिकांच्या नावामध्ये,पत्त्यामध्ये, सोसायटीच्या नावात,सदनिका नंबर यामध्ये त्वरीत दुरूस्ती केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मालमत्ता कर योग्य असल्याबद्दलची खात्री त्यांना पटत असल्याने मालमत्ता भरणामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. ३१ जुलै पर्यंत मालमत्ता करांवर सूट असल्याकारणाने नागरिकांनी याचा लाभ घेऊन वेळेत मालमत्ता कर भरावा असे आवाहन आयुक्त  गणेश देशमुख यांनी केले आहे.

दिनांक २६ जुलैचे दैनिक संकलन : नोड एकूण कर संकलन

१.पनवेल ११ लाख ६६ हजार ३७५
२.नवीन पनवेल,मोठा खांदा, ४६ लाख ९४ हजार ०२४
खांदा कॉलनी,आसुडगाव
३. कामोठे ४६ लाख २५ हजार १३०
४.खारघर ३४ लाख १९ हजार १६०
५.कळंबोली,रोडपाली १४ लाख ५२ हजार २९३
६. तळोजा,पाचनंद,नावडे २ लाख ९६ हजार ९०४
एकूण कर संकलन १ कोटी ५६ लाख ५३ हजार ८८६


हेही वाचा – सोशल मीडियाचा वापर कमी करा अन् निवडणुकीच्या तयारीला लागा; राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना ८ सूचना