घरCORONA UPDATECM Uddhav Thackeray Live: प्रशासन सतर्क, नागरिकांनी खबरदारी घ्यावी

CM Uddhav Thackeray Live: प्रशासन सतर्क, नागरिकांनी खबरदारी घ्यावी

Subscribe

महाराष्ट्राच्या रायगड, पालघर आणि मुंबई जिल्ह्यातील काही सागरी किनाऱ्यांना निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करत आहेत.

चक्रीवादळ आता आपल्या उंबरठ्यावर आले आहे. अलिबागला हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ पुर्वीच्या वादळांपेक्षा मोठे आहे. १०० ते १२५ किमी प्रतितास वारे वाहतील.

- Advertisement -

आपण प्रार्थना करुयात की हे वादळ येण्यापुर्वी क्षमावे.

३ जूनपासून आपण पुनश्च हरिओम करणार होतो. मात्र वादळाच्या पार्श्वभूमीवर आता किनाऱ्या लगतच्या परिसरात अधिकची खबरदारी घ्यावी लागणार आहे.

- Advertisement -

मनुष्यहानी किंवा प्राणीहानी होऊच नये, असा प्रयत्न आपण करणार आहोत.

मच्छिमार घरी परतले आहेत. पुढचे २ दिवस समुद्रात जायचे नाही.

अलिबागला जरी हे वादळ धडकण्याचा अंदाज असला तरी मुंबई ते सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांनी घराच्या आजुबाजुला सुट्या पडलेल्या वस्तू घरात आणून ठेवाव्यात ज्यामुळे त्या उडणार नाहीत किंवा कुणाला लागणार नाहीत.

वादळामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत करावा लागणार आहे.

वीजेचा अनावश्यक वापर करु नका. बॅटरीवर चालणाऱ्या वस्तू चार्ज करुन ठेवा. जेणेकरुन वादळ आल्यानंतर वीजपुरवठा खंडीत झाल्यास त्या वापरता येतील.

अंतिम परिक्षेबाबत आपण निर्णय घेतला, निसर्ग मात्र आपल्या परिक्षा घेण्यापासून थांबत नाही.

खबरदारीच्या उपाययोजना –

सुट्या वस्तू सांभाळून ठेवा

मोबाईल चार्ज ठेवा.

अफवा अजिबात पसरवू नका, दुरदर्शन आणि रेडिओवरील सूचनांकडे लक्ष द्या.

प्रशासन सतर्क आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.

शहरी भागात देखील झोपडपट्ट्यांतील रहिवाशांनी सुरक्षित राहावे.

जिथे मोठे छप्पर किंवा शेड बांधले आहेत. तिथे तुम्ही राहू नका. कारण वादळात ती उडण्याची शक्यता आहे.

आपण राज्यांमध्ये कोरोनावर उपचार करण्यासाठी फिल्ड हॉस्पिटल केले होते. जसे बीकेसी मधील कोविड सेंटर उभारले होते. ते आता आपण इतरत्र हलवत आहोत.

तात्पुरत्या आडोसा धरू नका. कारण हे वादळ जोरदार वाऱ्यासाहीत मुसळधार पाऊस घेऊन येत आहे.

विद्युत पुरवठा खंडीत ठेवा. कारण ग्रामीण भागात पाणी शिरल्यास विजेचा धक्का लागण्याची शक्यता आहे.

पिण्याच्या पाण्याचा साठा करुन ठेवा. प्रशासन मदतीला आहेच. पण पाण्यासारखी मुलभूत गोष्ट हाताशी असेल तर चांगलेच आहे.

नागरिकांनी घाबरून जात वेडंवाकडं पाऊल टाकू नये. कोरोनाचे संकटाला आपण जसे धैर्याने तोंड देत आहोत. तसे या संकटाला देखील आपण सामोरे जाऊ.

पुन्हा एकदा नागरिकांच्या धैर्याला मी वंदन करतो.

 

CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State #NisargaUpdates

CMOMaharashtra ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜೂನ್ 2, 2020

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -