घरताज्या घडामोडीनिर्माल्यातून तयार करणार कंपोस्ट खत ; चिंचवली ग्रांमपंचायतीचा अनोखा उपक्रम

निर्माल्यातून तयार करणार कंपोस्ट खत ; चिंचवली ग्रांमपंचायतीचा अनोखा उपक्रम

Subscribe

ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने ग्रामपंचातीच्या या अनोख्या उमक्रमाचे कौतुक होत आहे.

दीड दिवसाच्या आणि पाच दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीने नागरिकांना घरात जमा झालेले निर्माल्य नदीत न टाकता एकाच ठिकाणी जमा करण्याच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. ग्रामपंचयतीच्या माध्यमातून अनेक समजोपायोगी उपक्रम राबविले जात असतात. असाच उपक्रम यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात आला. या कालावधीत घरात जमा झालेले निर्माल्य म्हणजेच हार, फुले, फळे आणि नैवद्य या सर्व वस्तू विसर्जनाच्या वेळी नदीच्या प्रवाहात न टाकता एका ठिकाणी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. निर्माल्य नदीत टाकल्याने पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत असल्याने ग्रामपंचातीने हा निर्णय घेतला. इतर ग्रामपंचायतींनी देखील नागरिकांना आवाहन करून निर्माल्य नदी पात्रात न टाकता एका ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन केले.

चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील बार्डी गावातील तरुण हेंमत कोंडीलकर हे निर्माल्य गोळा करून त्यावर प्रक्रिया करून कंपास्ट खत तयार करीत आहेत. त्यांनी ही संकल्पना ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांना सुचविल्यानंतर त्यांनी लगेचच एक बॅनर लावून सर्व नागरिकांना निर्माल्य एकत्र करण्याचे आवाहन केले. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रापंचायत सदस्य तथा माजी उपसरंपच ॠषिकेश भगत, सुप्रिया भगत, जोस्ना भगत आदींनी पुढाकार घेवून हा प्रयोग यशस्वी करण्याचे ठरविले आहे. ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने ग्रामपंचातीच्या या आनोख्या उमक्रमाचे कौतुक होत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – केंद्राने केंद्राच्या प्रमाणे काम करावं राज्यांच्या अधिकारांवर…, अजित पवारांचे सूचक वक्तव्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -