Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी दिवंगत बॅ. ए.आर.अंतुले यांच्या स्वप्नातील रायगड घडवणार - महेंद्र घरत

दिवंगत बॅ. ए.आर.अंतुले यांच्या स्वप्नातील रायगड घडवणार – महेंद्र घरत

काँग्रेस चे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी घेतले बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या समाधी चे दर्शन.

Related Story

- Advertisement -

रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांच्या स्वप्नातील रायगद जिल्हा घडवायचा आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्र घरत यांनी म्हसळा तालुक्यातील आंबेत येथे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले. रायगड जिल्हा काँग्रेस चे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कोकणचे भाग्यविधाते बॅरिस्टर ऐ.आर अंतुले साहेब यांच्या जन्मगाव असलेल्या आंबेत या गावी जाऊन त्यांच्या माजारीवर(कबर) चादर अर्पण करून आशिर्वाद घेतले.

महेंद्र घरत हे रायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष झाल्यावर जिल्हा दौरा करण्याअगोदर त्यांना अंतुले साहेबांच्या जन्मगावी जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. आपल्या कार्याला सुरवात करण्यासाठी ते शनिवारी अंतुले साहेबांच्या आंबेत या गावी आले होते. यावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी आंबेत वासियांनी नवनिर्वाचित रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत स्वागत केले. यावेळी आंबेत ग्रामस्थांनी काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत याना बॅरिस्टर ऐ.आर अंतुले यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार मुश्ताक अंतुले, महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रवीण ठाकूर,मुईज शेख,माजी जिल्हा अध्यक्ष आर.सी. घरत,महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर, अलिबाग तालुका अध्यक्ष योगेश मगर,मुरूड नगरसेवक विश्वास चव्हाण आदीसहित असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

-अमूलकुमार जैन


हे ही वाचा – Tokyo Paralympicsमध्ये कृष्णा नागरची बॅडमिंटनमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी


- Advertisement -

 

- Advertisement -