रायगडचे जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्या समवेत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने २० सप्टेंबरला भेट घेतली. यावेळी नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली सर्व बांधकामे नियमित करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या समवेत सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय अधिकारी आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांची बैठक झाली. ती बांधकामे नियमित करण्यासाठी ठाणे आणि रायगड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत परीक्षण करण्याचे ठरले आहे. त्याबाबत आवश्यक असलेली पुढील कार्यवाही झालेली आहे ठाणे येथील एका एजेंसीला परीक्षण करण्याचे काम दिलेले आहे . त्या परीक्षणसाठी लागणारा खर्च सिडको महामंडळ भरण्यास तयार आहे. तरी लवकरच गावठाणातील घराचा परीक्षण होऊन नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली बांधकामे नियमित होतील असे महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. जिल्हाधिकारी यांच्या बैठकीसाठी पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, पनवेल काँग्रेस अध्यक्ष आर सी घरत, पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते.
हे ही वाचा – देशातील महिला अत्याचारांविरोधात संसदेचे ४ दिवसीय अधिवेशन घ्या, उद्धव ठाकरेंचे राज्यपालांच्या पत्राला उत्तर