उरण – पनवेल मार्गावर कंटेनर ट्रेलर पुलावरून कोसळून भीषण अपघात ; एकाचा मृत्यू

अपघातामुळे जेएनपीटी बंदराकडे जाणारी मालवाहू रेल्वेसेवा ९ तास ठप्प झाली होती.

Container trailer falls off bridge on Uran - Panvel road; Death of one
उरण - पनवेल मार्गावर कंटेनर ट्रेलर पुलावरून कोसळून भीषण अपघात ; एकाचा मृत्यू

जासई गावाजवळील अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा उरण -पनवेल मार्गावर भीषण अपघात घडला. या अपघातात कंटेनर घेऊन जाणारा ट्रेलर पुलावरुन रेल्वे रुळावर कोसळून एकजण ठार झाला आहे. याशिवाय या अपघातामुळे रेल्वे वाहतूकही ९ तास ठप्प होती. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी २० नोव्हेंबरला रात्री ९:३० च्या सुमारास जासई-दापोली मालवाहू महामार्गावर घडली आहे.कंटेनर घेऊन निघालेल्या भरधाव ट्रेलर ओव्हर ब्रिजवरून थेट खाली रेल्वे रुळावर कोसळली. हा ट्रेलर पुलावरून खाली कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली.त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली त्यामुळे सेवा पूर्ववत करण्यासाठी रेल्वेच्या मदत गाड्या घटनास्थळी पोहोचल्या, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली. मात्र या भीषण अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला .

 

जेएनपीटी बंदर व नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी जेएनपीटी, सिडको आणि राज्य, केंद्र शासन यांनी उरण, नवीमुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात उड्डाण पूलाची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे.परंतु या तीन ही व्यवस्थापनाच्या डोळे झाक कारभारामुळे उड्डाण पूलावर अपघाताची संख्या बळावली आहे.त्यात नव्याने वाहतूकीसाठी सुरु करण्यात आलेल्या उड्डाण पूलावरुन शनिवारी २० नोव्हेंबरला रात्री ९:३० च्या सुमारास मालाची वाहतूक करणारा कंटेनर टेलर पलटी होण्याची दुदैवी घटना घडली.

सदर मालानी भरलेला कंटेनर टेलर पुलावरुन ३० ते ४० फुटांवरून जेएनपीटी बंदराच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे रुळावर पडला.या झालेल्या अपघातात कंटेनर टेलर चालकांचा जागीच मुत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.सदर अपघातामुळे जेएनपीटी बंदराकडे जाणारी मालवाहू रेल्वेसेवा ९ तास ठप्प झाली होती.या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, वाहतूक पोलीस यंत्रणा घटना स्थळी तात्काळ दाखल झाली.परंतु या परिसरातील अंधारामुळे रेल्वे रुळ मोकळा करण्यासाठी तसेच तपास कार्यात अडथळा निर्माण झाला होता.

यापूर्वी पुलाचा गर्डर कोसळला अन् भीषण अपघात घडला

उरणच्या जेएनपीटी बंदराच्या माध्यामातून जेएनपीटी ते अमरमार्ग या रस्त्यावरील शेवटच्या पुलाचे काम सुरू असताना पूल उभारणीचा लोखंडी गर्डर कोसळून झालेल्या अपघातात एका कामगाराचा जागच्या जागी मृत्यू झाला. तर अन्य सहा कामगार गंभीररित्या जखमी झाले असल्याची घटना घडली आहे. जखमींना वाशी येथील एमजीएम इस्पितळात हलवण्यात आले आहे. या अपघातामुळे जेएनपीटी मार्गातील वाहतूक सलग चार तास रोखण्यात आली होती.


हे ही वाचा – Amravati violence: अमरावतीमध्ये हिंसाचारावर एकतर्फी कारवाई करत भाजप नेत्यांना अटक, फडणवीसांचा आरोप