घरताज्या घडामोडीपडीक जमिनीवर बांबूच्या लागवडीने पर्यावरण संरक्षणाला हातभार लावण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

पडीक जमिनीवर बांबूच्या लागवडीने पर्यावरण संरक्षणाला हातभार लावण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Subscribe

यातून शेतकर्‍यांचे स्वत:चे आर्थिक उत्पन्न वाढवू शकतात.

पडीक जमिनीवर बांबू लागवड करून पर्यावरण संरक्षणासाठी शेतकरी हातभार लावू शकतात, असे वनवृत्तचे वृत्त समन्वयक अजय पिलारी यांनी आवाहन केले आहे. यातून शेतकर्‍यांचे स्वत:चे आर्थिक उत्पन्न वाढवू शकतात. जागतिक बांबू दिवसाच्या निमित्ताने बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे पिलारी म्हणाले. बांबू कारागिरांना त्यांच्या रोजगाराची हमी देण्याचा सर्वांनी निश्चय करावा, असे आवाहनही त्यांनी केले. दरवर्षी १८ सप्टेंबर या दिवशी जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. बांबू हे बहुउपयोगी वनउपज असून आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे त्यास हिरवे सोने असे संबोधले जाते.

बांबूचा उपयोग करून मनुष्य जीवनात विकासाची वाटचाल सुरू झाल्याचे इतिहाससुद्धा साक्ष आहे. पुरातन काळातही बांबूचा घरबांधणी, अवजारे, हत्यारे व घरगुती वस्तूसाठी वापर करण्यात येत असत. बांबू कारागिरी त्या काळापासून विकसित होत गेली आणि वस्तूमध्ये सुद्धा सुधार होत गेला. मोठ्या प्रमाणात बांबू सहज उपलब्ध होत होते आणि त्या काळात सर्वसाधारणतः सर्वांना आवश्यक वस्तू बांबूचा उपयोग करून बनविण्याची कला अवगत होती. आजपर्यंत आदिवासी पाड्यांमध्येसुद्धा जवळ-जवळ सर्वांना बांबूचा वापर करून त्यांना लागणारी वस्तू तयार करता येत होती.

- Advertisement -

आधुनिक युगामध्ये बांबू वस्तूंना प्लास्टिकचा पर्याय आल्याने आदिवासी बांधवांचे कुशलतेचा उपयोग कमी होऊ लागला. आज ग्रामीण भागांमध्ये सुद्धा प्लास्टिकच्या वस्तू पोहोचून ग्रामस्थांची आर्थिक परिस्थिती खालावत गेली आणि प्रदूषणाचा स्तर सुद्धा वाढू लागला. बांबूचे ग्रामीण भागांमध्ये ग्रामीण बांधवांचे आर्थिक स्तर उंचावण्यामध्ये योगदान होतेच. त्याचप्रमाणे प्रदूषणावर सुद्धा पर्यायाने नियंत्रण होते याची जाणीव ठेवून केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय बांबू मिशनची स्थापना केली.राज्यस्तरावर महाराष्ट्र बांबू विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. याद्वारे चांगल्या बांबू प्रजातीच्या रोपांची लागवड खाजगी क्षेत्रामध्ये तसेच पडीक क्षेत्रामध्ये करण्याची योजना आखण्यात आली असल्याची माहिती पिलारी यांनी दिली.


हे ही वाचा – E-Auction: मोदींच्या भेटवस्तूंचा आज ई लिलाव; ऑलिम्पिक खेळाडूंच्या जॅव्हेलिन, बॅडमिंटन, हॉकी स्टिकचा समावेश

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -