घरताज्या घडामोडीसावधान, राज्यात पुन्हा वाढतोय कोरोना

सावधान, राज्यात पुन्हा वाढतोय कोरोना

Subscribe

राज्यातून कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचा दिलासादायक चित्र असताना पुन्हा कोरोनाने केरळ आणि महाराष्ट्रात डोके वर काढायला घेतले आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात ४० हजार रुग्णांचा टप्पा ओलांडल्याचे उघड झाले आहे. यामुळे राज्य प्रशासनाला पुन्हा एकदा चिंतेने ग्रासले आहे. तिकडे केरळमध्येही रुग्णांचा टप्पा दुपटीने वाढल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारून स्पष्ट झाले आहे. या दोन्ही राज्यांच्या रुग्ण संख्येत जवळपास ४६ हजारांची भर पडली आहे.

गेल्या २४ तासात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५०९ इतकी झाली असून, संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३१ हजारांच्या संख्येत आहे. गेल्या शुक्रवारी मृतांची संख्या ४९६ होती. ती आज १३ ने वाढली. महाराष्ट्रातील रुग्ण दाखल होण्याच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेत वाढ झाली आहे. देशातही रुग्णांची संख्या ४४ हजारांनी वाढली. देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटी २६ लाख ५० हजारांच्या घरात गेली आहे. कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आठ लाखांनी कमी झाली आहे. जी गेल्या आठवड्यात दाखल संख्येहून कमी होती. देशातील लसीकरणाच्या पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ६२ कोटींहून अधिक आहे. केरळमध्येही रुग्ण संख्येत विक्रमी वाढ झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. काल एका दिवसात ३२ हजार रुग्णांची नव्याने नोंद करण्यात आली. तर एका दिवसात १७९ जणांना प्राणास मुकावे लागले.

- Advertisement -

राज्यात काल एका दिवसात 4,654 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 301 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 55 हजार 451 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के आहे. मात्र काल मृतांची संख्या १७०च्या घरात होती. सद्यस्थितीत राज्यात ५१ हजार ५७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. त्यांची संख्या १३ हजार ७१५ इतकी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -